विरोधकांना नेपाळ, बांगला देशसारखी परिस्थिती भारतात करायची आहे. त्यांना सरकार नाही तर देशातील व्यवस्था बदलायची आहे. राहुल गांधी दररोज खोटं बोलतात, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केलाय. विरोधकांचा उद्देश लोकशाही मोडीत काढणे आणि भारतात अराजकता निर्माण करून एक पूर्णपणे नवीन व्यवस्था प्रस्थापित करायची आहे. त्यांना केवळ सरकार बदलायचे नाही, तर संपूर्ण राजवटच बदलायची आहे. लोकशाहीत सरकारे बदलत असतात, कधी एका पक्षाची सत्ता असते, तर कधी दुसऱ्या पक्षाची. परंतु विरोधकांना केवळ सरकार बदलण्याबद्दल चर्चा नाही, तर ती 'रेजीम बदलण्या'बदलायची आहे. ही कोणती व्यवस्था आहे? ही तीच व्यवस्था आहे जी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात लोकशाहीच्या स्वरूपात राज्यघटनेद्वारे प्रस्थापित केली होती. आता ती व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यांना भारतात अशी व्यवस्था आणायची आहे, जी नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका किंवा पाकिस्तानमध्ये आहे, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.