

दिवाळीचा सण संपल्यानंतर गोवर्धन पूजेची तयारी सुरू होते. भगवान श्रीकृष्णाला समर्पित असलेला हा सण मोठ्या श्रद्धेनं साजरा केला जातो. या दिवशी गोवर्धन पर्वताची पूजा केली जाते. तसेच भगवान श्रीकृष्णाला अन्नकूटाचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा असते. पण यंदा गोवर्धन पूजा नेकमी ९ नोव्हेंबरला आहे की १० नोव्हेंबरला, असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. त्यामुळे जाणून घेऊया गोवर्धन पूजेची तारीख, शुभ मुहूर्त, पूजेची विधी आणि या सणाचं महत्त्व.
हिंदू पंचांगानुसार, कार्तिक महिन्यातल्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला गोवर्धन पूजा केली जाते. २०२६ मध्ये प्रतिपदा तिथी ९ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजून ३१ मिनिटांनी सुरू होईल आणि १० नोव्हेंबरला दुपारी २ वाजता संपेल. उदयातिथीनुसार, यंदा गोवर्धन पूजा मंगळवार, १० नोव्हेंबर २०२६ रोजी साजरी केली जाईल.
पुजेची तारीख - १० नोव्हेंबर २०२६, मंगळवार
प्रतिपदा तिथी सुरूवात - ९नोव्हेंबर २०२६, दु. १२.३१ वाजल्यापासून
प्रतिपदा तिथी समाप्ती - १० नोव्हेंबर २०२६, दु. २ वाजता.
सकाळचा पूजा मुहूर्त - सकाळी ६.४० ते ८.५०
अभिजित मुहूर्त - सकाळी ११.४३ ते दुपारी १२.२६
गोधूली मुहूर्त - संध्याकाळी ५.३० ते ५.५६
पौराणिक कथेनुसार, भगवान श्रीकृष्णाने ब्रजवासीयांना इंद्रदेवाऐवजी गोवर्धन पर्वताची पूजा करण्यास सांगितले होते. यामुळे रागावलेल्या इंद्रदेवाने ब्रजमध्ये मुसळधार पाऊस पाडला. तेव्हा श्रीकृष्णाने आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून गावातील लोक आणि जनावरांचे रक्षण केले. या घटनेच्या स्मरणार्थ गोवर्धन पूजा केली जाते. ही पूजा करताना सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ कपडे घातले जातात. घराच्या अंगणात शेणापासून गोवर्धन पर्वताची प्रतिकृती तयार केली जाते. मग त्याला फुले, रोली आणि अक्षता अर्पण करून सजवतात. भगवान श्रीकृष्णाची मूर्ती किंवा फोटो ठेवून दिवा लावला जातो.मग फळं, मिठाई आणि विविध पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. शेवटी धार्मिक परंपरेनुसार गोवर्धन पर्वताला सात वेळा प्रदक्षिणा घातल्या जातात.
टीप: हे मुहूर्त दिल्लीच्या पंचांगानुसार दिले आहेत. तुमच्या शहरानुसार वेळेत बदल होऊ शकतो. धार्मिक मान्यतेनुसार, अन्नकूटाचा प्रसाद ग्रहण केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते आणि अन्नधान्याची कमतरता भासत नाही, अशी श्रद्धा आहे. साम टिव्ही याची शाश्वती घेत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.