Infertility saam tv
लाईफस्टाईल

Infertility: प्लास्टिकच्या डब्यांपासून कॉस्मेटिक्सपर्यंत...; घरातील या वस्तू तुमच्या प्रजनन क्षमतेवर करतायत परिणाम! संशोधनातून धक्कादायक माहिती

Fertility problems: प्लास्टिक, कीटकनाशकं आणि रोजच्या वापरातील वस्तूंमध्ये आढळणारे अँडोक्राईन डिस्टरप्टिंग केमिकल्स (EDCs) हार्मोन्समध्ये अडथळा निर्माण करून महिला आणि पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम करू शकतात. तज्ज्ञांनी सांगितलेले धोके, कारणं आणि महत्त्वाची माहिती जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

आजच्या काळात वंध्यत्वाची समस्या झपाट्याने वाढताना दिसतेय. आहे. ही केवळ एखाद्या व्यक्तीची समस्या नसून आरोग्यासमोरचे मोठे आव्हान बनले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, जगातील दर सहा पैकी एका व्यक्तीला आयुष्यात कधी ना कधी वंध्यत्वाचा सामना करावा लागतो. त्याचवेळी, जवळपास प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात 'अँडोक्राईन डिस्टरप्टिंग केमिकल्स' म्हणजे हार्मोन्सच्या कामात अडथळा आणणारी रसायनं आढळतायत.

हे दोन्ही प्रकार एकाच वेळी वाढत असल्याने यामागे केवळ योगायोग नसून या रसायनांचा वंध्यत्वाशी संबंध असल्याचे अनेक संशोधनांमधून समोर आलंय. ही रसायनं शरीरातील हार्मोन्सच्या नैसर्गिक कामात अडथळा आणतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही रसायनं आपल्या आजूबाजूलाच असतात. प्लास्टिकच्या बाटल्या, अन्न ठेवण्याचे डबे, सौंदर्य प्रसाधनं, रोजच्या वापरातील अनेक वस्तू, तसंच शेतीमध्ये वापरली जाणारी कीटकनाशकं आणि इतर रसायनांमधून त्यांचा संपर्क होत असतो. त्यामुळे त्यांच्यापासून पूर्णपणे दूर राहणं जवळपास अशक्य आहे.

EDCs म्हणजे नेमके काय?

मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचे कन्सल्टन्ट, आयव्हीएफ डॉ. हितेशा रामनानी रोहिरा यांनी सांगितलं की, अँडोक्राईन डिस्टरप्टिंग केमिकल्स म्हणजे अशी रसायने जी शरीरातील हार्मोन्सच्या निर्मितीमध्ये, त्यांच्या कार्यामध्ये आणि शरीरातील संतुलनात अडथळा आणतात. हार्मोन्स हे शरीरातील अनेक महत्त्वाच्या प्रक्रिया नियंत्रित करत असतात. त्यामुळे त्यांचे संतुलन बिघडल्यास शरीरावर अनेक गंभीर परिणाम होऊ शकतात.

या रसायनांचा परिणाम फक्त त्या व्यक्तीपुरता मर्यादित राहत नाही. त्याचा पुढील पिढ्यांवरही परिणाम होऊ शकतो, अशी चिंता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

कोणती रसायनं धोकादायक आहेत?

या गटामध्ये अनेक प्रकारची रसायने येतात.

बिस्फेनॉल ए (BPA) आणि थॅलेट्स (Phthalates) ही रसायनं अन्नपदार्थांच्या पॅकेजिंगमध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जातात. अन्न तयार करताना किंवा साठवताना ही रसायने अन्नामध्ये मिसळू शकतात.

ऑर्गनोफॉस्फेट आणि ऑर्गनोक्लोराईड प्रकारची कीटकनाशके प्रजनन क्षमतेवर वाईट परिणाम करू शकतात.

डॉ हितेशा यांनी सांगितलं की, डायॉक्सिन्स आणि त्यासारखी इतर रसायनं कचरा उघड्यावर जाळणं, अचानक लागलेल्या आगी किंवा कचऱ्याच्या भस्मीकरणातून हवेत पसरतात. त्यानंतर ती दूषित अन्न, पाणी आणि प्रदूषित वातावरणातून शरीरात प्रवेश करतात.

या रसायनांचा शरीराशी संपर्क कसा येतो?

आपण नकळत अनेक मार्गांनी या रसायनांच्या संपर्कात येत असतो.

  • प्लास्टिकच्या वस्तू

  • कीटकनाशकं

  • औद्योगिक रसायनं

  • आग रोखण्यासाठी वापरली जाणारी रसायनं

  • सौंदर्य प्रसाधनं आणि वैयक्तिक देखभालीची उत्पादनं

  • दूषित अन्न आणि पाणी

  • प्रदूषित हवा

  • घरातील धूळ

  • त्वचेचा थेट संपर्क

महिलांच्या प्रजनन क्षमतेवर कसा परिणाम होतो?

महिलांमध्ये या रसायनांमुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडते. त्यामुळे अंड्यांची योग्य वाढ आणि परिपक्व होण्याची प्रक्रियेवर परिणाम होतं. काही वेळा अंडं तयार होण्यातही अडचण येते.

याशिवाय,

गर्भाशयाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.

एंडोमेट्रिओसिसचा धोका वाढू शकतो.

अंडाशयाचे काम अपेक्षेपेक्षा लवकर बंद पडू शकते.

गर्भातील बाळामध्ये जन्मजात दोष निर्माण होण्याची शक्यता वाढते.

पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर काय परिणाम होतो?

या रसायनांचा पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवरही गंभीर परिणाम होतो.

शुक्राणूंची गुणवत्ता कमी होते.

शुक्राणूंची संख्या घटते.

त्यांची हालचाल कमी होते.

गेल्या ५० वर्षांत जगभरातील पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या निम्म्याहून अधिक कमी झाल्याचं संशोधनातून समोर आलंय. ही घट आजही सुरू असून तिचा वेग वाढत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुष्काळाच्या पाहणी दौऱ्याला दांडी; जिल्हाधिकाऱ्यांनी केज तहसीलदारांचा पदभार तडकाफडकी काढला

Maharashtra News Live Update: मुंबई आणि उपनगरात ढगांच्या गडगडासह जोरदार पाऊस

१ मेसेजचे १४ पैसे घेणार WhatsApp! १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम, तुमच्यावर काय परिणाम?

Skipping Dinner For Diabetes: रात्रीचे जेवण टाळल्याने डायबिटीज कंट्रोलमध्ये राहतो का? रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो? जाणून घ्या

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

SCROLL FOR NEXT