Skipping Dinner For Diabetes: रात्रीचे जेवण टाळल्याने डायबिटीज कंट्रोलमध्ये राहतो का? रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो? जाणून घ्या

Manasvi Choudhary

डायबिटीज

डायबिटीज रुग्णांसाठी खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवणे गरजेचे असते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी डाएट फॉलो करतात.

Diabetes | pinterest

रात्रीचे जेवण टाळल्याने डायबिटीज वाढतो का?

काही लोक वजन नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा शुगर लेव्हल कमी करण्यासाठी भात खाणे सोडतात किंवा रात्रीचे जेवण करणे पूर्णपणे टाळतात. परंतु, रात्रीचे जेवण टाळल्याने खरोखरच डायबिटीज नियंत्रणात राहतो का? याविषयी जाणून घ्या.

Diabetes | pinterest

जेवण टाळणे आणि रक्तातील साखरेचा समतोल

अनेकांना वाटते की जेवण न केल्याने शरीरात शुगर वाढणार नाही, परंतु हा एक गैरसमज आहे. वैद्यकीय सल्ल्यानुसार, जेवण टाळल्यामुळे किंवा जेवणाच्या वेळेत खूप जास्त अंतर ठेवल्यामुळे शरीरातील साखरेची पातळी अचानक खूप खाली जाऊ शकते, ज्याला हायपोग्लाइसेमिया म्हणतात.

Blood Sugar Imbalance

औषधे आणि इन्सुलिनवर होणारा परिणाम

जर तुम्ही डायबिटीजसाठी नियमितपणे औषधे किंवा इन्सुलिन घेत असाल आणि अशातच रात्रीचे जेवण टाळले, तर चक्कर येणे, अशक्तपणा आणि घाम फुटणे यांसारखे गंभीर त्रास होऊ शकतात. औषधांच्या प्रभावामुळे रिकाम्या पोटी शरीराला धोका निर्माण होऊ शकतो.

Blood Sugar Imbalance | Google

पचनसंस्थेवर होणारा ताण

एकाच वेळी खूप जास्त खाणे किंवा थेट जेवण पूर्णपणे बंद करणे या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. यामुळे चयापचय क्रिया मंदावते आणि शरीराला आवश्यक असणारी ऊर्जा मिळत नाही.

डायबिटीजच्या रुग्णांनी काय काळजी घ्यावी?

रात्रीचे जेवण पूर्णपणे टाळण्याऐवजी हलके, पौष्टिक आणि पचनास सोपे अन्न घ्या. आहारात फायबरयुक्त भाज्या, सॅलेड आणि प्रोटिनयुक्त पदार्थांचा समावेश करा. रात्रीचे जेवण झोपण्याच्या किमान २ ते ३ तास आधी घ्या, जेणेकरून अन्न नीट पचेल आणि साखरेची पातळी नियंत्रणात राहील.

diabetes | pinterest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Canva

NEXT: Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

Whatsapp Account Imporatant Tips
येथे क्लिक करा..