Shruti Vilas Kadam
सूर्यनमस्कारामध्ये शरीरातील जवळपास सर्व प्रमुख स्नायू कार्यरत होतात. त्यामुळे संपूर्ण शरीराचा प्रभावी व्यायाम होण्यास मदत मिळते.
नियमित सूर्यनमस्कार केल्याने सांधे आणि स्नायू अधिक लवचिक होण्यास मदत होते. त्यामुळे शरीराचा ताठरपणा कमी होऊ शकतो.
सूर्यनमस्कार हा कॅलरी बर्न करणारा व्यायाम मानला जातो. संतुलित आहारासोबत नियमित सराव केल्यास वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.
वेगवेगळ्या आसनांमुळे पोटाच्या स्नायूंवर ताण येतो, ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत मिळू शकते.
श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रित करून सूर्यनमस्कार केल्यास मन शांत राहण्यास आणि तणाव कमी होण्यास मदत होऊ शकते.
सूर्यनमस्कारामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते. त्यामुळे शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकतो.
नियमित सूर्यनमस्कार केल्याने शरीरात उत्साह टिकून राहण्यास आणि दिवसभर काम करण्याची क्षमता वाढण्यास मदत मिळू शकते.
( टिप: यासह योग्य आहार घेणे महत्वाचे आहे सामटिव्ही याची पृष्ठी करत नाही)