Lower Back Pain: दिवसभर बसून काम करता? झोपण्याआधी १० मिनिटं करा 'हा' उपाय; पाठदुखीपासून मिळेल आराम

Shruti Vilas Kadam

जपानी टॉवेल मेथड म्हणजे काय?

या पद्धतीमध्ये टॉवेल घट्ट गुंडाळून कमरेखाली ठेवून काही मिनिटे सरळ झोपले जाते. त्यामुळे पाठीचा कणा आणि शरीराची ठेवण (पोस्चर) सुधारण्यास मदत होऊ शकते.

severe lower back pain causes | Google

पाठदुखी कमी होण्यास मदत

दीर्घकाळ बसून काम करणाऱ्यांमध्ये स्नायूंवर ताण येतो. ही पद्धत स्नायूंना आराम मिळवून देण्यास आणि हलकी पाठदुखी कमी करण्यास काही लोकांना उपयुक्त ठरू शकते.

Lower Back Pain

पोस्चर सुधारण्यास मदत

सतत वाकून बसल्यामुळे शरीराची ठेवण बिघडते. नियमितपणे योग्य पद्धतीने हा व्यायाम केल्यास पोस्चर सुधारण्यास मदत मिळू शकते.

Lower Back Pain

कंबरेचा ताण कमी होऊ शकतो

कंबरेभोवतीचे स्नायू आणि पाठीचा खालचा भाग ताणमुक्त होण्यास मदत होते. त्यामुळे दीर्घकाळ बसल्यानंतर होणारा त्रास कमी होऊ शकतो.

Lower Back Pain

योग्य पद्धतीनेच करा

टॉवेल घट्ट गुंडाळून तो कमरेखाली ठेवावा. हात डोक्याच्या वर सरळ ठेवून, पाय ताणून अंगठे एकमेकांकडे वळवून ३ ते ५ मिनिटे झोपावे.

Lower Back Pain

वेदना वाढल्यास थांबा

हा व्यायाम करताना तीव्र वेदना, चक्कर किंवा अस्वस्थता जाणवल्यास त्वरित थांबावे आणि वैद्यकीय सल्ला घ्यावा.

Lower Back Pain | Yandex

सर्वांसाठी योग्यच असेल असे नाही

डिस्कची समस्या, तीव्र कंबरदुखी, अलीकडील दुखापत किंवा हाडांचे विकार असलेल्या व्यक्तींनी डॉक्टर किंवा फिजिओथेरपिस्टचा सल्ला घेतल्याशिवाय ही पद्धत वापरू नये.

Lower Back Pain | Saam Tv

Health Care: जेवल्यानंतरही सतत काहीतरी खावंसं वाटतं? 'या' ७ कारणांमुळे वाढू शकते भूक

Health Care | Saam Tv
येथे क्लिक करा