Shruti Vilas Kadam
आहारात प्रथिनांचे प्रमाण कमी असल्यास पोट लवकर रिकामे झाल्यासारखे वाटते. त्यामुळे वारंवार भूक लागण्याची शक्यता वाढते.
कमी झोपेमुळे भूक नियंत्रित करणाऱ्या हार्मोन्समध्ये बदल होतात. परिणामी, जास्त खाण्याची इच्छा निर्माण होऊ शकते.
सतत भूक लागणे, वारंवार तहान लागणे आणि वजन कमी होणे ही मधुमेहाची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. अशी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
हायपरथायरॉईडीझममध्ये शरीराचा चयापचय (मेटाबॉलिझम) वेगाने होतो. त्यामुळे वारंवार भूक लागण्याची समस्या जाणवू शकते.
तणाव, चिंता किंवा भावनिक अस्वस्थतेमुळे अनेकजण गरजेपेक्षा जास्त खातात. यामुळे सतत भूक लागल्यासारखे वाटू शकते.
अनेकदा तहान आणि भूक यामध्ये गोंधळ होतो. पुरेसे पाणी न प्यायल्यास भूक लागल्यासारखी भावना निर्माण होऊ शकते.
काही औषधांमुळे, विशेषतः स्टेरॉइड्स किंवा काही मानसिक आरोग्यासाठी दिल्या जाणाऱ्या औषधांमुळे भूक वाढू शकते. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.