Shruti Vilas Kadam
सुरुवातीला कपाळ, डोळे, गाल, जबडा आणि जीभ यांवरील ताण कमी करा. चेहऱ्याचे स्नायू रिलॅक्स केल्याने शरीर शांत होण्यास मदत होते.
खांदे खाली सोडा आणि दोन्ही हातांवरील ताण हळूहळू कमी करा. शरीर जितके रिलॅक्स होईल तितकी झोप लवकर लागण्याची शक्यता वाढते.
हळू, खोल आणि नियमित श्वास घ्या. शांत श्वासोच्छ्वासामुळे हृदयाचे ठोके स्थिर होतात आणि मन शांत होण्यास मदत मिळते.
मांड्या, गुडघे, पिंडऱ्या आणि पायाचे पंजे एकामागोमाग पूर्णपणे सैल सोडा. संपूर्ण शरीर रिलॅक्स झाल्यावर झोप सहज लागते.
10 सेकंदांसाठी मन रिकामे ठेवण्याचा प्रयत्न करा. सतत विचार येत असतील तर शांत निसर्गदृश्य किंवा आरामदायी जागेची कल्पना करा.
मोबाईल, टीव्ही किंवा लॅपटॉपचा वापर झोपण्याच्या किमान 30 ते 60 मिनिटे आधी बंद करा. निळ्या प्रकाशामुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो.
दररोज शक्यतो एकाच वेळी झोपा आणि उठा. नियमित दिनचर्येमुळे शरीराचे जैविक घड्याळ संतुलित राहते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते.