Ashadhi Ekadashi 2026: आषाढी एकादशीचा उपवास बनवा हेल्दी; 'हे' ७ पदार्थ देतील दिवसभर ताकद आणि एनर्जी

Shruti Vilas Kadam

साबुदाणा खिचडी

साबुदाणा हा कार्बोहायड्रेटचा उत्तम स्रोत आहे. शेंगदाणे आणि बटाट्यासह बनवलेली साबुदाणा खिचडी शरीराला दिवसभर एनर्जी देण्यास मदत करते.

Sabudhana Khichdi | Google

राजगिरा

राजगिऱ्याची भाकरी, लाडू किंवा शीरा उपवासात खाऊ शकता. राजगिऱ्यात प्रथिने, कॅल्शियम आणि लोह भरपूर प्रमाणात असल्याने तो पौष्टिक पर्याय ठरतो.

Rajgira | yandex

हलके पदार्थ

रताळे, बटाट्यांनध्ये फायबर, जीवनसत्त्व A आणि नैसर्गिक गोडवा असतो. त्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि शरीराला एनर्जी मिळते.

फळे

केळी, सफरचंद, डाळिंब, पपई किंवा मोसंबी यांसारखी ताजी फळे खाल्ल्याने शरीराला जीवनसत्त्वे, खनिजे आणि पुरेसे पाणी मिळते.

apple | pinterest

दुग्धजन्य पदार्थ

दही, ताक, लस्सी पचनासाठी फायदेशीर असून शरीर थंड ठेवण्यास मदत करते. उपवासात दही किंवा ताकाचे सेवन केल्यास ताजेतवाने वाटते.

Dahi

सुकामेवा

बदाम, अक्रोड, काजू, मनुका आणि खजूर यांसारखा सुकामेवा शरीराला हेल्दी फॅट्स, प्रथिने आणि झटपट ऊर्जा देतो.

मखाणे

तुपात हलके भाजलेले मखाणे किंवा मखाण्याची खीर हा उपवासातील उत्तम स्नॅक आहे. यात कॅल्शियम, प्रथिने आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात.

Makhana | GOOGLE

Stomach Cancer Symptoms: पोट साफ होत नाही, सतत अॅसिडिटीचा त्रास? दुर्लक्ष करू नका; पोटाच्या कॅन्सरचे 7 लक्षणे

Stomach Cancer Symptoms | AI
येथे क्लिक करा