Shruti Vilas Kadam
शौचाचा रंग काळपट होणे किंवा त्यात रक्त दिसणे हे पोटातील अंतर्गत रक्तस्रावाचे लक्षण असू शकते. अशी समस्या वारंवार होत असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
नेहमीपेक्षा कमी अन्न खाल्ल्यानंतरही पोट भरल्याची भावना होत असेल, तर ते पोटाच्या कॅन्सरचे सुरुवातीचे लक्षण असू शकते.
वारंवार अपचन, अॅसिडिटी किंवा छातीत जळजळ होत असेल आणि औषधांनंतरही आराम मिळत नसेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
आहारात कोणताही बदल न करता अचानक भूक कमी होणे किंवा वजन झपाट्याने घटणे हे गंभीर संकेत असू शकतात.
सतत मळमळ, पोटात दुखणे किंवा अस्वस्थता जाणवत असेल आणि ती दीर्घकाळ कायम राहत असेल, तर वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे.
शरीरात रक्ताची कमतरता (अॅनिमिया) निर्माण झाल्यास सतत थकवा, अशक्तपणा आणि एनर्जी कमी झाल्यासारखे वाटू शकते.