Shruti Vilas Kadam
1 कप उकडलेले स्वीट कॉर्न, 2 कप इडली-डोसा पीठ, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 हिरवी मिरची, 1 टीस्पून किसलेले आले, 2 टेबलस्पून कोथिंबीर, मीठ, चिमूटभर हळद, 1 टीस्पून जिरे आणि तेल.
मिक्सरमध्ये अर्धे स्वीट कॉर्न जाडसर वाटून घ्या. हे वाटलेले कॉर्न इडली-डोसा पिठात मिसळा. त्यात उरलेले पूर्ण दाणेही घाला.
तयार मिश्रणात कांदा, हिरवी मिरची, आले, जिरे, हळद, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून सर्व साहित्य चांगले एकजीव करा.
अप्पे पॅन गरम करून प्रत्येक साच्यात थोडे तेल लावा. तयार मिश्रण साच्यांमध्ये ओता आणि झाकण ठेवून 3-4 मिनिटे शिजवा.
एक बाजू सोनेरी झाल्यावर अप्पे हलक्या हाताने पलटवा. दुसरी बाजूही कुरकुरीत आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजा.
गरमागरम कॉर्न अप्पे नारळाची चटणी, हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करा. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी हा उत्तम पर्याय आहे.
अप्पे अधिक पौष्टिक बनवण्यासाठी त्यात किसलेले गाजर, शिमला मिरची, पालक किंवा किसलेले चीज घालू शकता. मुलांसाठी हा एक हेल्दी आणि चविष्ट नाश्ता ठरू शकतो.