Shruti Vilas Kadam
रात्री उशिरा जेवल्यानंतर शरीराची हालचाल कमी होते. त्यामुळे कॅलरी योग्य प्रकारे खर्च होत नाहीत आणि वजन वाढण्याची शक्यता वाढते.
जेवल्यानंतर लगेच झोपल्यास अन्न नीट पचत नाही. त्यामुळे अॅसिडिटी, छातीत जळजळ आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो.
जड किंवा मसालेदार जेवण केल्यामुळे रात्री अस्वस्थता जाणवते. त्यामुळे शांत आणि गाढ झोप लागण्यास अडथळा निर्माण होतो.
रात्री उशिरा जेवल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. मधुमेहाचा धोका असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
सतत उशिरा जेवण्याची सवय असल्यास कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब वाढण्याचा धोका वाढू शकतो, ज्याचा हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
उशिरा जेवल्यामुळे शरीराला पुरेशी विश्रांती मिळत नाही. त्यामुळे सकाळी उठल्यावर थकवा, जडपणा आणि आळस जाणवू शकतो.
रात्री झोपण्याच्या किमान २ ते ३ तास आधी जेवण करा. हलका, संतुलित आणि सहज पचणारा आहार घ्या. रात्री जास्त तेलकट, मसालेदार आणि गोड पदार्थ टाळल्यास आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.