Midnight Hunger: तुम्हाला देखील मध्यरात्री भूक लागते? गोड खायची इच्छा होते? हे आहे त्यामागचं कारण

Shruti Vilas Kadam

दिवसभर पुरेसा आहार न घेणे

दिवसभर कमी खाल्ल्यास किंवा जेवण वेळेवर न केल्यास रात्री शरीराला उर्जेची गरज भासते आणि मध्यरात्री भूक लागू शकते.

Midnight Hunger | Canva

रात्रीचे जेवण अपुरे असणे

रात्रीच्या जेवणात प्रथिने, फायबर आणि पौष्टिक घटकांची कमतरता असल्यास पोट जास्त वेळ भरलेले राहत नाही आणि काही तासांत पुन्हा भूक लागते.

Midnight Hunger | Canva

तणाव आणि मानसिक ताण

तणावामुळे शरीरात कोर्टिसोल हार्मोनचे प्रमाण वाढते. त्यामुळे अनेकांना रात्री गोड किंवा जंक फूड खाण्याची इच्छा होते.

Midnight Hunger | Canva

झोपेची कमतरता

पुरेशी झोप न झाल्यास भूक नियंत्रित करणाऱ्या घ्रेलिन आणि लेप्टिन या हार्मोन्सचे संतुलन बिघडते. त्यामुळे रात्री वारंवार भूक लागण्याची शक्यता वाढते.

Midnight Hunger

जास्त साखर किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे

दिवसभर गोड पदार्थ, सॉफ्ट ड्रिंक्स किंवा जंक फूड जास्त खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी चढ-उतार होते, ज्यामुळे रात्री अचानक भूक लागू शकते.

Intense Hunger | pinterest

शरीरात पाण्याची कमतरता

कधी-कधी तहान आणि भूक यामध्ये गोंधळ होतो. शरीरात पुरेसे पाणी नसल्यास भूक लागल्यासारखे वाटू शकते. त्यामुळे दिवसभर पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे.

Midnight Hunger | Google

औषधांचा परिणाम

मधुमेह, थायरॉईडचे विकार, काही औषधांचे दुष्परिणाम किंवा हार्मोनल बदलांमुळेही मध्यरात्री वारंवार भूक लागू शकते. अशी समस्या सतत जाणवत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Midnight Hunger | pinterest

Health Care Tip: पावसाळ्यात आजारांपासून राहायचंय दूर? घरच्या घरी करा हे सोपे ७ उपाय

Health Care Tip | Saam Tv
येथे क्लिक करा