

पूर्वी हार्ट अटॅक म्हणजे वयोवृद्ध लोकांचा आजार मानला जात होता. मात्र साधारणपणे 60 वर्षांनंतरच हार्ट अटॅक येतो असं मानलं जायचं. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये हे चित्र पूर्णपणे बदललेलं पाहायला मिळतंय. आजकाल तरुणांमध्येही हार्ट अटॅकची प्रकरणं झपाट्याने वाढतंय. आजकाल तिशी आणि चाळीशीच्या वयातील तरूणांचाही जीव हार्ट अटॅकने जात असल्याचं समोर येतंय.
यामागे बदललेली जीवनशैली हे मोठं कारण असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. सततचा ताण, अपुरी झोप, बाहेरचे आणि तेलकट अन्न, व्यायामाचा अभाव, धूम्रपान आणि इतर काही आजार यामुळे हार्ट अटॅकचा वाढू शकतो. काही लोकांमध्ये हा धोका इतरांपेक्षा अधिक असतो. .
अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या माहितीनुसार, काही वेळा हार्ट अटॅक अचानक येतो. पण अनेक रुग्णांमध्ये अटॅक येण्याआधी काही लक्षणं दिसू लागतात. ही लक्षणं वेळेत ओळखली तर मोठा धोका टाळता येऊ शकतो.
छातीत दुखणं, दडपण किंवा अस्वस्थ वाटण
जबडा, मान किंवा पाठीमध्ये वेदना होणे
हात किंवा खांद्यात असामान्य वेदना किंवा जडपणा जाणवणं
श्वास घेण्यास त्रास होणं
अचानक खूप थकवा जाणवणं
मळमळ, उलटी किंवा अस्वस्थ वाटणं
डॉ. व्ही. राजशेखर यांच्या मते, वाढतं वय, तंबाखूचं सेवन आणि चुकीची जीवनशैली ही हार्ट अटॅकची प्रमुख कारणं आहेत. याशिवाय खालील व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी.
ज्यांना आधीपासून हृदयाशी संबंधित आजार आहेत त्यांना हा धोका जास्त असतो
ज्यांना किडनीचे आजार आहेत त्यांनाही हा धोका अधिक असतो
कोरोनरी आर्टरी डिसीज असलेल्या व्यक्तींमध्ये धोका अधिक असतो
स्लीप अॅपनियाचा उपचार न घेतल्यास किंवा दीर्घकाळ ताणतणाव आणि नैराश्य असल्यासही धोका वाढू शकतो
साधारणपणे 40 ते 75 वर्षे वयोगटात हार्ट अटॅकचा धोका जास्त असतो. मात्र सध्या तरुणांमध्येही ही समस्या वाढताना दिसतंय. महिलांमध्ये 55 वर्षांनंतर तर पुरुषांमध्ये 45 वर्षांनंतर हार्ट अटॅकचं प्रमाण अधिक दिसतं. कुटुंबात हार्ट अटॅकचा इतिहास असेल तर धोका वाढू शकतो.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मेटाबॉलिक सिंड्रोम असलेल्या व्यक्तींनीही काळजी घ्यावी. HIV किंवा AIDS असलेल्या रुग्णांमध्येही हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो. त्याचप्रमाणे डायबिटीज, हाय बीपी आणि कोलेस्ट्रॉल असणाऱ्यांनी विशेष सतर्क राहावं.
मेयो क्लिनिकच्या माहितीनुसार, हार्ट अटॅकवर वेळेत उपचार झाले तरी पुढील आयुष्यात काही गंभीर हृदयाच्या आजारांचा धोका कायम राहू शकतो.
हृदयातील इलेक्ट्रिकल सिग्नल बिघडल्याने हृदयाची धडधड अनियमित होऊ शकते
काही रुग्णांमध्ये हृदय अचानक शरीराला पुरेसं रक्त पंप करू शकत नाही. त्यामुळे दुर्मिळ प्रसंगी कार्डिओजेनिक शॉक येऊ शकतो
हार्ट फेल्युअर होण्याची शक्यता वाढते
कार्डियाक अरेस्ट म्हणजे कोणतीही पूर्वसूचना न देता हृदयाची धडधड अचानक बंद पडण्याचाही धोका वाढू शकतो
हृदयासाठी चांगला आहार घ्या
सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट असलेले पदार्थ कमी खा
मीठ आणि साखरेचं प्रमाण मर्यादित ठेवा
डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घ्या आणि नियमित तपासणी करून घ्या
ताण कमी ठेवण्याचा प्रयत्न करा
रक्तदाब नियंत्रणात ठेवा आणि वेळोवेळी तपासा
धूम्रपान आणि मद्यपान टाळा
वजन नियंत्रणात ठेवा
मधुमेह असल्यास रक्तातील साखर नियमित नियंत्रणात ठेवा
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.