Father-Son Relationship SAAM TV
लाईफस्टाईल

Father-Son Relationship : वारंवार मुलगा आणि वडिलांमध्ये खटके उडतात? अशाप्रकारे घट्ट करा रिलेशन

Fight Between Father And Son : आपण अनेक वेळा पाहतो की, मुलगा आणि वडिलांमध्ये सतत भांडणे होत असतात. यावर उपाय जाणून घ्या आणि बाप-लेकाच नातं घट्ट करा.

Shreya Maskar

मुलगा हा आईचा लाडका तर मुलगी ही वडिलांचा जीव असे नाते संबंध आपण आजवर पाहत आलो आहोत. पण याचा अर्थ असा नाही की, आईच मुलीवर आणि बापाच मुलावर प्रेम नाही. दोघही आपल्या दोन्ही मुलांवर खूप प्रेम करतात आणि त्यांना समान वागवतात. मात्र आपण पाहतो की, बाप-लेकाचे सतत भांडणे होतात. यामुळे घराचे वातावरण ही बिघडते. पण यामागे दोन महत्त्वाची कारणे असतात. ती कारणे जाणून घेऊन त्यावर सांगितलेले उपाय करा. मग पाहाल की, बाप- लेकाच नातं कस घट्ट होईल.

बाप-लेकामध्ये भांडणाची कारणे - उपाय

आर्थिक परिस्थिती

मुलगा आणि वडिलांमध्ये अनेक वेळा पैशांवरून भांडणे होतात. वडिलांचे अस मत असते की, मुलाला नोकरीला लागल्यावर कुटुंबाची जबाबदारी घ्यावी. मात्र मुलगा तेव्हा आपले करिअर बनवण्यात व्यस्त असतो की, त्याला कुटुंबाला वेळ देता येत नाही. तसेच जर मुलाला पगार जास्त नसेल तर पैशाच्या नियोजनात घराला वाटा कमी येतो त्यामुळे वडिलांची चिडचिड होते. तसेच काही मुल मोठी असूनही कामाच्या बाबत खूप कंटाळा करतात. त्यामुळे घरातील मोठा व्यक्ती म्हणून वडिलांना ओरडाव लागत.

उपाय : यावर मुलांनी वडिलांना समजून सांगितले पाहिजे की, आपली काय परिस्थिती आहे. तसेच आपले भविष्याचे काय विचार किंवा प्लान आहेत. यामुळे वडिलांना एक कल्पना येते. तसेच वडिलांनी देखील मुलाची परिस्थिती समजून घेतली पाहिजे. मुलगा कुठे चुकत असेल तर त्याला न ओरडता आणि मारता नीट समजून सांगितले पाहिजे.

चुकीच्या सवयी

घरात वडील शिस्तीसाठी खूप कठोर असतात. कॉलेजमध्ये असताना अनेक मुलांना वाईट संगत लागते आणि याचा परिणाम मुलांच्या अभ्यासावर पडतो. तसेच मुलांचे घरीही दुर्लक्ष तसेच वाईट संगतीमुळे मुलं व्यसनाच्या अधीन जातात.

उपाय : यावर वडिलांनी मुलाशी संवाद साधून त्याची वाईट संगत सोडवली पाहिजे. वडिल जर मुलाशी वाद घालू लागले तर, नात्यात दूरावा वाढतो. तसेच मुलाच्या मनात बापाविषयी मनात अढी निर्माण होते. त्यामुळे शांतपणे संवाद साधा. तसेच मुलांनी ही वडिलांना समजून घ्या की, त्यांची एवढी चिडचिड का होत आहे ते, कारण मुलांना चांगले शिकता यावे आणि त्यांचे भविष्य चांगले घडावे म्हणून वडिलांनी भूतकाळात खूप कष्ट केले असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

SCROLL FOR NEXT