सुशील थोरात
अहमदनगर : रात्रीच्या सुमारास पाण्याची मोटार बंद करण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला. मात्र मुलीचे वडील आल्याने मुलगा अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. त्यामुळे पुढील अनर्थ ठरला. याबाबत जाब विचारायला गेलेल्या मुलीसह तिच्या वडिलांना जबर मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
अहमदनगरमध्ये (Ahmednagar) रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला हि धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत पाण्याची सुरु असलेली मोटार बंद करण्यासाठी मुलगी घराबाहेर पडली. यावेळी बाहेर असलेल्या एका मुलाने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. याच वेळी वडील घराबाहेर आल्याने त्यांना मुलीचा आवाज आल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र मुलीच्या वडिलांना बघताच (Crime News) अंधाराचा फायदा घेत मुलगा तेथून पसार झाला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे मुलगी घाबरून गेली होती.
मुलीसह वडिलांना मारहाण
दरम्यान मुलाच्या कुटुंबाला जाब विचारण्यास गेल्यावर वडिलांसह मुलीवर दगडाने हल्ला केला. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. मात्र मुलीने चेहरा ओळखल्याने अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी आरोपीच्या घरी जाऊन सदरची घटना सांगितली असता संशयिताच्या कुटुंबीयांनी मुलीलाच जबर मारहाण केली. या मारहाणीत मुलगी गंभीर जखमी झाली असून तिला जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून सहा जणांना विरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.