Parenting Tips : बाळाला पाळण्यात झोपवताय? पालकांनो, वेळीच सोडा ही सवय, नाहीतर...

Child Health Care : आजकाल लहान बाळाला पाळण्यात झोपवले जाते. मात्र बाळाच्या शारीरिक वाढीसाठी ही सवय चुकीची आहे. त्यामुळे ती वेळीच सोडणे योग्य राहील.
Child Health Care
Parenting TipsSAAM TV
Published On

लहान बाळ घरी येताच पाळणा घरी आणला जातो. यामागे बाळाला शांत झोप लागावी. तसेच त्याला कोणती इजा होऊ नये हा असतो. परंतु पाळणाच बाळाच्या आरोग्यासाठी घातक आहे. पाळण्यामुळे बाळाच्या शरीराची वाढ नीट होत नाही. तसेच शरीरावर नकारात्मक परिणाम होताना दिसून येतो.

बाळाला पाळण्यात झोपवण्याचे दुष्परिणाम

पोश्चर बिघडते

लहान मुलांना रात्री पाळण्यात झोपवण्यामुळे त्यांच्या शरीराचे पोश्चर बिघडते. लहान वयात असे होणे चुकीचे आहे. कारण लहान वयातच मुलांना आकार येतो. त्यामुळे शरीराची विशेष काळजी घेतली पाहिजे. यामुळे बाळाचे डोके पुढे वाकून त्याला श्वास घेण्यास त्रास होतो.

इजा होण्याची शक्यता

बरेच लोक मुलांना पाळण्यात झोपून स्वतःच्या कामाला जातात. मात्र बाळ झोपेत असताना अनेक वेळा पाळण्यात रांगते, पालथे होते आणि लाथ मारते. यामुळे बाळाच्या हाता पायाला इजा होण्याची शक्यता जास्त असते.

शारीरिक हालचालीवर परिणाम

बाळाला पाळण्यात ठेवल्यामुळे त्यांच्या शारीरिक हालचालींवर मर्यादा येऊन शरीरावर नकारात्मक परिणाम होताना दिसतो. मुलांच्या स्नायूंचा तसेच हाडांचा विकास होत नाही. कारण मुलांना त्यांच्या शारीरिक विकासासाठी जास्त जागा हवी असते.

मेंदूचे आरोग्य धोक्यात

पाळण्यात बाळाची मान सरळ राहत नाही. त्यामुळे बाळाच्या मेंदूला आधार मिळत नाही.याचा बाळाच्या स्नायूंवर परिणाम होतो.

Child Health Care
Parenting Tips : पालकांनो! लहान वयात मुलांना आत्मनिर्भर बनवायचंय? 'या' ५ गोष्टी शिकवा, घडेल उज्जवल भविष्य

बाळाला पाळण्यात कधी ठेवावे?

तज्ज्ञांच्या मते, लहान बाळाला कधीही सपाट पृष्ठभागावर झोपवावे. कारण यामुळे बाळाला शरीराची नीट हालचाल करता येते. तसेच त्याच्या शरीराला आधार देखील मिळतो. बाळाला थोडा वेळ खेळण्यासाठी फक्त तुम्ही पाळण्याचा वापर करू शकता.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Child Health Care
Parenting Tips : पालकांनो! मुलांना घरात एकटे सोडताय? 'या' गोष्टींची घ्या खबरदारी, चिंता होईल दूर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com