Sky Swing Accident: आकाश पाळण्यात बसण्याची हौस जीवावर बेतली; केस अडकले अन् उंचावरून खाली कोसळली

Sky Swing Accident : जत्रेतील आकाश पाळण्यात बसलेल्या तरुणीचा उंचावरून पडून दुर्देवी मृत्यू झाला आहे.
Sky Swing Accident
Sky Swing AccidentSaam TV

Sky Swing Accident : जत्रेतील आकाश पाळण्यात बसणं आणि धमाल करणं हा अनुभव नेहमीच सगळे घेत असतात. मोठमोठ्या पाळण्यात बसून थरार अनुभवण्याची अनेकांना आवड असते. पण ही धमाल अनेकदा जीवावरही बेतू शकते. अशीच एक घटना पश्चिम बंगालमधील बांकुडा जिल्ह्यात घडली.

येथे एका जत्रेतील आकाश पाळण्यात बसलेल्या तरुणीचा उंचावरून पडून दुर्देवी मृत्यू झाला आहे. प्रियंका बाउरी (वय २० वर्ष) असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव असून ती भादुल गावची रहिवाशी आहे. (Latest Marathi News)

Sky Swing Accident
Dog Attack Video: आईसमोरच पिसाळलेल्या कुत्र्याचा चिमुकल्यावर हल्ला; थरकाप उडवणारी घटना CCTVत कैद

शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ देखील (Viral Video) समोर आला आहे. व्हिडीओ पाहून अनेकांना धडकी भरली आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, चैत्र संक्रातीनिमित्त बांकुडा जिल्ह्यात सध्या उत्साह साजरा केला जात आहे. ठिकठिकाणी जत्रा भरल्या आहेत. मनोरंजनासाठी सिनेमा थिअटर तसेच सर्कस सुद्धा आल्या आहेत. थरार अनुभवण्यासाठी जत्रेत आकाशपाळणे सुद्धा लावण्यात आले आहेत. (Breaking Marathi News)

अशातच भादुल गावातील २० वर्षीय प्रियांका आपल्या मित्रांसोबत फिरण्यासाठी जत्रेत आली होती. जत्रेतील आकाश पाळणे बघताच प्रियांकाला त्याच्याच बसण्याचा मोह आवरला नाही. ती आकाश पाळण्यात बसली. दरम्यान, पाळणा सुरू असताना प्रियांकाचे केस मोकळे होते.

Sky Swing Accident
Virar Ambedkar Jayanti News: आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत मोठी दुर्घटना; विजेचा शॉक लागून दोघांचा मृत्यू, ३ गंभीर

हवेमुळे प्रियांकाचे केस पाळण्यातील वरच्या बाजूला अडकले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, केस अडकल्याने प्रियांका सीटवरून हवेत लटकली. काही वेळ ती लटकून होती. प्रियांकाचे केस अडकल्याचे बघताच तिच्या मित्रांनी आरडाओरड केली. काही वेळात पाळणा थांबवण्यात आला.

काही कळण्याच्या आतच ती धाडकन जमिनीवर कोसळली. स्थानिकांनी बेशुद्ध अवस्थेत असणाऱ्या प्रियांकाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात जाण्याआधीच वाटेतच तिचा मृत्यू झाला होता.

या थरारक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रियांकाचा मृत्यू कसा झाला हे अगदी स्पष्टपणे व्हिडीओत दिसतं आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com