Dog Attack Video: आईसमोरच पिसाळलेल्या कुत्र्याचा चिमुकल्यावर हल्ला; थरकाप उडवणारी घटना CCTVत कैद

Dog Attack Viral Video : पुण्यातील आंबेगाव तालुक्यातून एक थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला आहे.
Ambegaon Dog Attack Viral Video
Ambegaon Dog Attack Viral VideoSaam TV

Ambegaon Dog Attack Viral Video : पुण्यातील आंबेगाव तालुक्यातून एक थरकाप उडवणारा व्हिडीओ (Viral Video) समोर आला आहे. आईसोबत भाजीमंडईत गेलेल्या चिमुकल्यावर पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात चिमुकल्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अंगावर काटा आणणारी ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. (Latest Marathi News)

Ambegaon Dog Attack Viral Video
Solapur News : एकाला वाचवायला गेले अन् चौघेही बुडाले; भीमा नदीत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

शुमन किरण गुंजाळ (वय ५ वर्ष) असं जखमी झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे. कुत्र्याने त्याच्या तोंडावर चावा घेतला असून त्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. सुरुवातीला मंचर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्याला तातडीने पुणे येथे उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. फैजल अब्बासली कुमेरली मीर या मुलालाही पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठवण्यात आलं आहे.

आंबेगाव (Pune News) तालुक्यातील मंचर शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला असून नागरिकांना घराबाहेर पडणे देखील कठीण झाले झाले आहे. शहरातील विविध भागात पिसाळलेल्या कुत्र्याने आतापर्यंत तब्बल १२ जणांचा चावा घेतला आहे.

पिसाळलेल्या कुत्र्याच्या दहशतीमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या कुत्र्याचा तातडीने बंदोबस्त करा अशी, मागणी नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान, नागरिकांच्या तक्रारीनंतर मोकाट कुत्र्याचा शोध घेण्याचं काम शासकीय कर्मचाऱ्यांकडून सुरू होतं. (Breaking Marathi News)

मंचर शहरात कुलदैवत यात्रेला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे मंचर शहर गजबजून गेलं आहे. मुंबई आणि पुण्यातून अनेकजण या यात्रेसाठी आपल्या गावी येत असतात. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे. अशातच शुक्रवारी पहाटेपासून शहरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस घातला.

समोर येईल त्याला चावा घेण्यास या कुत्र्याने (Dog Attack) सुरूवात केली. हा कुत्रा रस्त्यावर बेफामपणे फिरत होता. मंचरमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ चालू असताना अखेर मंचर सुपर मार्केट, स्टेट बँकेजवळ पिसाळलेला कुत्र्याला ग्रामस्थांनी ठार केलं. या कुत्र्याला ठार केल्याची वार्ता मंचर शहरात समजतात अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com