Thyroid Disease Symptoms saam tv
लाईफस्टाईल

Thyroid Disease Symptoms: अचानक जास्त थंडी वाजतेय? सावध व्हा, थायरॉईडच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Signs Your Thyroid Is Not Working Properly: थायरॉईड ही शरीराच्या चयापचय क्रियेला नियंत्रित करणारी महत्वाची ग्रंथी आहे. जास्त थंडी जाणवणं, वजन वाढणं, मासिक पाळीत बदल आणि लक्ष केंद्रीत करण्यात अडचण ही थायरॉईडची सुरुवातीची लक्षणं असू शकतात.

Surabhi Jayashree Jagdish

कोणतीही समस्या असली तरी त्याबाबत आपलं शरीर इशारा देत असतं. मात्र शरीर देत असलेल्या संकेतांकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. अनेकदा थायरॉईडच्या समस्येमध्ये असा दुर्लक्षपणा दिसून येतो. थायरॉईड ही मानेच्या पुढच्या भागात असलेली एक लहान, फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी असते. ही शरीराच्या चयापचय क्रियेला नियंत्रित करते.

जेव्हा थायरॉईड योग्यरित्या काम करत नाही तेव्हा शरीरात विविध बदल दिसून येतात. ही लक्षणं काय आहे ही तुम्ही वेळीच जाणून घेतली पाहिजे. ही लक्षणं दिसल्यानंतर डॉक्टरांची भेट केव्हा घ्यावी हे पाहूयात.

ही 4 लक्षणं दिसली तर व्हा सतर्क

जास्त प्रमाणात थंडी वाजणं

एस्प्रेसोच्या हेल्थ रिपोर्टनुसार, जर हवामान सामान्य असेल परंतु तुम्हाला इतरांपेक्षा जास्त प्रमाणात थंडी लागत असेल तर ते तुमचं चयापचय क्रिया मंदावत असल्याचं लक्षण असू शकतं. ज्यावेळी थायरॉईड हार्मोनची पातळी कमी असते तेव्हा शरीर कमी ऊर्जा निर्माण करते. परिणामी तुम्हाला जास्त थंडी जाणवते.

लक्ष केंद्रीत करण्यात अडचण

वारंवार विसरणं, लक्ष केंद्रित करण्यास असमर्थता किंवा सतत आळस येणं ही देखील थायरॉईडच्या समस्यची लक्षणं असू शकतात. हार्मोन्सचं असंतुलन हे तुमच्या मानसिक कार्यावर परिणाम करतं.

मासिक पाळीत बदल होणं

महिलांमध्ये अनेकदा याचा परिणाम अधिक दिसून येतो. यामध्ये अनियमित मासिक पाळी किंवा नेहमीपेक्षा जास्त रक्तस्त्राव होणं हे थायरॉईडच्या समस्येशी संबंधित असू शकतं. हार्मोनल असंतुलनाचा थेट मासिक पाळीवर परिणाम होतो.

कारणाशिवाय वजन वाढणं

जर तुम्ही तुमच्या आहारात कोणतेही बदल न करता तुमचं वजन वाढत असेल तर ते चयापचय मंदावल्याचं लक्षण असू शकतं. ज्यावेळी थायरॉईड हार्मोन्सची पातळी कमी होते तेव्हा शरीरात कॅलरीज बर्न होण्याचं प्रमाणही संथ गतीने होतं.

डॉक्टरांची कधी भेट घ्यावी?

जर वर दिलेल्या लक्षणं ही अनेक आठवडे टिकून राहिली किंवा हळूहळू वाढत गेली तर TSH, T3 आणि T4 साठी रक्त तपासणी करणं महत्वाचं आहे. जर उपचार लवकर सुरू केले तर थायरॉईडची समस्या नियंत्रणात ठेवता येते. जर त्यावर उपचार केले गेले नाहीत तर ते तुमच्या हृदयावर, वजनावर, मानसिक आरोग्यावर आणि प्रजनन क्षमतेवर देखील परिणाम होतो.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुनेत्रा पवार मुख्यमंत्री व्हाव्यात, मंत्री छगन भुजबळांनी व्यक्त केली इच्छा, पाहा नेमकं काय म्हणाले?

Maharashtra News Live Update: अहिल्यानगरमधील करंजी घाटात दोन वेगवेगळ्या ठिकाणी ट्रकचे अपघात; वाहतूक ठप्प

State Cabinet Expansion: राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार,बंडखोर आमदारांची वर्णी लागणार

सोलापूरच्या राजकारणात भूकंप, ३ दिग्गजांचा शिंदेसेनेत प्रवेश, एकनाथ शिंदे म्हणाले...

...तरीही आशाताई खचल्या नाहीत; ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर राज ठाकरेंची पोस्ट

SCROLL FOR NEXT