लाईफस्टाईल

Traffic Challan: हेल्मेट घातल्यानंतरही भरावा लागू शकतो दंड; एका छोट्याशा चुकीमुळे बसेल मोठा भुर्दंड

Challan on Helmet: आपल्यातील अनेक दुचाकी चालकांना वाटतं की, त्यांनी हेल्मेट डोक्यावर घातलं म्हणजे त्यांना दंड होणार नाही. परंतु हेल्मेट डोक्यात घालून उपयोग नाहीतर एक छोटीशी गोष्ट डोक्यात ठेवून दंड मिळण्यापासून वाचू शकतो.

Bharat Jadhav

Challan on Helmet:

अनेकवेळा आपल्याला एखाद्या गोष्टीची पुरेशी कल्पना नसली तर आपल्याला त्याचा भुर्दंड भरावा लागतो. जसं आपण बाईक चालवताना हेल्मेट परिधान करतो पण एका छोट्या चुकीमुळे आपल्याला हजारो रुपयांचा दंड भरावा लागतो. हेल्मेट असून वाहतूक पोलिसांनी दंड घेतला असं म्हणून आपण ओरड करत असतो. पण आपल्यातील अनेक दुचाकी चालकांना वाटतं की, त्यांनी हेल्मेट डोक्यावर घातलं म्हणजे त्यांना दंड होणार नाही. परंतु हेल्मेट डोक्यात घालून उपयोग नाहीतर एक छोटीशी गोष्ट डोक्यात ठेवून दंड मिळण्यापासून वाचू शकतो. (Latest News)

हेल्मेट परिधान करण्याची योग्य पद्धत

तुम्ही स्कूटर चालवत असाल किंवा स्कुटी, स्पोर्ट बाईक तुम्हाला हेल्मेट परिधान करणं आवश्यक आहे. नाहीतर वाहतूक पोलीस तुम्हाला दंड करतील. पण तुम्ही हेल्मेट घातलं म्हणजे पोलीस तुम्हाला दंड करणार नाहीत असं वाटत असेल तर हा तुमचा भ्रम आहे. कारण हेल्मेट परिधान करण्याचीही एक योग्य पद्धत आहे. हेल्मेट तुमच्या डोक्यावर व्यवस्थीतपणे बसलायला हवा.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)


म्हणजे तो एकदम फिट पण नको आणि एकदम सैलही नको. हेल्मेट लावल्यानंतर त्याची पट्टी देखील बांधली गेली पाहिजे. जेणेकरून हेल्मेट योग्य पद्धतीने बसेल आणि तुमच्या डोक्याला सुरक्षित ठेवेल. जर तुम्ही हेल्मेट घेतलं आणि त्याची पट्टी बांधली नाही तरी सुद्धा वाहतूक पोलीस तुम्हाला दंड आकारतील.

खिश्याला बसेल २ हजार रुपयांचा फटका

बाईक चालवताना हेल्मेट परिधान केलं नाही तर चालान म्हणजेच दंड आकारण्याचा नियम आहे. जर तुम्ही बाईक चालवत आहात आणि तुम्ही हेल्मेट परिधान केले नसेल तर तुम्हाला थेट दोन हजार रुपयांचा दंड आकारला जाईल. त्यात जर तुम्ही फक्त नावापुरतं हेल्मेट डोक्यावर ठेवलं असेल आणि त्याची पट्टी नीट बांधली नसेल तर वाहतूक पोलीस त्यासाठी सुद्धा दंड आकारतील. त्यासाठी १ हजार रुपयांचा दंड आकारण्याचा नियम आहे.

कोणतं हेल्मेट घ्याल

भारतीय गुणवत्ता ब्युरो आयएसआय प्रमाणित नसलेले हेल्मेट परिधान केल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. बहुतेक वेळा दुचाकीधारक पोलिसांना दूर हेल्मेट असल्याचं दिसावं म्हणून कोणतं ही हेल्मेट डोक्यावर परिधान करत असतात. परंतु जर वाहतूक पोलिसांनी त्या हेल्मेटवरील मार्क तपासला तर तुम्हाला हेल्मेट असूनही दंड भरावा लागेल. यासाठी पोलीस थेट १ हजार रुपयाचे चालान देऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Varicha Bhat Recipe: उपवासाचा वरीचा भात कसा बनवायचा? सोपी रेसिपी

Sleep Health: तुम्ही दररोज उशीरा उठता? मग वजनावर होणारा 'हा' धक्कादायक परिणाम नक्की वाचा

Maharashtra Police : ४ लाख रुपयांनी भरलेली बॅग हरवली, अवघ्या अर्ध्या तासांत शोधून काढली, पाली पोलिसांचे होतेय कौतुक

Solapur : सोलापूरमध्ये सीना नदीचा पूर ओसरला, पण पावसाला पुन्हा सुरुवात |VIDEO

Anya Singh: 'बॅड्स ऑफ बॉलीवूड'मधली आन्या सिंह कोण आहे? शाहरुख खानसोबत आहे खास नातं

SCROLL FOR NEXT