स्कूटीच्या किमतीत Electric Car करा खरेदी! देशातील सर्वात स्वस्त EV लॉन्च, वाचा सविस्तर

Yakuza Karishma : इलेक्ट्रिक ऑटो मार्केटची व्याप्ती दररोज वाढत आहे. अलीकडेच देशातील सर्वात लहान इलेक्ट्रिक कार याकुजा करिश्मा इलेक्ट्रिक कार सादर करण्यात आली. जी ईव्ही मार्केटमधील सर्वात स्वस्त आणि सर्वात लहान इलेक्ट्रिक कारपैकी एक असेल.
Yakuza Karishma Electric Car
Yakuza Karishma Electric CarSaam Tv
Published On

Yakuza Karishma The Smallest EV In India :

इलेक्ट्रिक ऑटो मार्केटची व्याप्ती दररोज वाढत आहे, ज्यामध्ये इलेक्ट्रिक दुचाकी ते चारचाकी वाहनांचा समावेश आहे. अलीकडेच देशातील सर्वात लहान इलेक्ट्रिक कार याकुजा करिश्मा इलेक्ट्रिक कार सादर करण्यात आली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जी ईव्ही मार्केटमधील सर्वात स्वस्त आणि सर्वात लहान इलेक्ट्रिक (Electric) कारपैकी एक असेल. ही इलेक्ट्रिक कार आगामी Tata Nano EV पेक्षाही लहान असणार आहे. याआधीही MG COMET EV सारख्या मस्त आणि छोट्या इलेक्ट्रिक कार (Car) मार्केटमध्ये दाखल झाल्या आहेत. ही कार बाईकच्या किमतीपेक्षा कमी आहे.आम्ही तुम्हाला तिची फीचर्स आणि किंमत जाणून घेऊयात.

ही इलेक्ट्रिक कार हरियाणातील सिरसा येथे असलेल्या एका इलेक्ट्रिक वाहन निर्मिती कंपनीने बनवली आहे आणि ही इलेक्ट्रिक कार ईव्ही मार्केटमध्ये उत्तम प्रकारे लॉन्च (Launch) करणार आहेत. या छोट्या इलेक्ट्रिक कारमध्ये 60v42ah पॉवर बॅटरी वापरण्यात आली आहे.

Yakuza Karishma Electric Car
Xiaoma Mini EV: एका चार्जमध्ये मुंबईहून थेट दिल्ली गाठणार; किंमत फक्त 3.47 लाख; जबरदस्त आहे ही मिनी EV

याशिवाय कंपनीने दावा केला आहे की, ही इलेक्ट्रिक कार एका चार्जमध्ये सुमारे 50-60 किलोमीटरची रेंज देऊ शकते. कमी अंतराचा प्रवास करणाऱ्यांसाठी हे खूप उपयुक्त ठरेल. या इलेक्ट्रिक कारला पूर्णपणे चार्ज करण्यासाठी 6-7 तास लागतात.

फीचर्स

याकुझा करिश्मा इलेक्ट्रिक कारची रेंज 50-60 किलोमीटर एवढी आहे, टॉप स्पीड 50-80 किलोमीटर प्रति तास, बॅटरी 60v42ah पॉवर बॅटरी एवढी आहे.

Yakuza Karishma Electric Car
Electric Car Care: हिवाळ्यात या प्रकारे घ्या तुमच्या इलेक्ट्रीक कारची काळजी; अन्यथा येऊ शकतात समस्या

इंटेरिअर

कार 3 सीटर असणार आहे. त्याचा लुक खूपच आकर्षक करण्यात आला आहे. याशिवाय, या ईव्ही कारमध्ये तुम्हाला एलईडी डीआरएल, प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी फॉग लॅम्प, ब्रॉड ग्रिल, क्रोम डोअर हँडल, कनेक्टेड एलईडी टेल लॅम्प, पॉवर विंडो, बॉटल होल्डर यांसारखी वैशिष्ट्ये पाहायला मिळतील.

किंमत

या छोट्या इलेक्ट्रिक कारची एक्स-शोरूम किंमत 1.79 लाख रुपये असणार आहे. ते खरेदी करण्यासाठी, तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून ते ऑनलाइन बुक करू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com