Xiaoma Mini EV: एका चार्जमध्ये मुंबईहून थेट दिल्ली गाठणार; किंमत फक्त 3.47 लाख; जबरदस्त आहे ही मिनी EV

Bestune Xiaoma Mini EV: एका चार्जमध्ये मुंबईहून थेट दिल्ली गाठणार; किंमत फक्त 3.47 लाख; जबरदस्त आहे ही मिनी EV
Bestune Xiaoma mini EV starts At 3.5 lakh
Bestune Xiaoma mini EV starts At 3.5 lakhSaam Tv
Published On

Bestune Xiaoma mini EV starts At 3.5 lakh:

चीनच्या फर्स्ट ऑटो वर्क्सची (FAW) मायक्रो-EV सेगमेंटमध्ये आपली पकड मजबूत करण्याची योजना आहे. यासाठी कंपनीने बेस्टून ब्रँड अंतर्गत Xiaoma Small Electric लॉन्च केली आहे. या महिन्यापासून या इलेक्ट्रिक कारची प्री-सेल्स सुरू होणार आहे.

FAW Bestune Xiaoma थेट Wuling Hongguang Mini EV शी स्पर्धा करेल. सध्या ती चीनमध्ये सर्वाधिक विकली जाणारी मायक्रो कार आहे. बेस्टून शाओमाची किंमत 30,000 ते 50,000 युआन (सुमारे 3.47 लाख ते 5.78 लाख रुपये) दरम्यान असेल.

Bestune Xiaoma mini EV starts At 3.5 lakh
Prevent Travel Sickness: तुमच्याही मुलांना कार आणि बसमध्ये उलट्या होतात? तर करा 'हे' उपाय

FAW ने या वर्षाच्या सुरुवातीला शांघाय ऑटो शोमध्ये बेस्टून शाओमा सादर केली होती. याचा हार्डटॉप आणि Convertible दोन्ही प्रकार सादर करण्यात आले आहेत. सध्या फक्त हार्डटॉप प्रकार विकला जाईल. convertible व्हेरिएंट भविष्यात विक्रीसाठी उपलब्ध होणार की नाही, याबद्दल अद्याप कंपनीने कोणतीही माहिती जाहीर केली नाही. या कारमध्ये टचस्क्रीन इन्फोटेनमेंट देखील आहे, जी 7-इंच युनिट आहे. याच्या डॅशबोर्डला आकर्षक ड्युअल-टोन थीम मिळते. (Latest Marathi News)

Xiaoma मध्ये एक बॉक्सी प्रोफाइल आहे, ज्यामध्ये ड्युअल-टोन कलर स्कीम आहे. अधिक आकर्षक प्रोफाइलसाठी यात गोलाकार कोपऱ्यांसह मोठे चौकोनी हेडलॅम्प आहेत. शाओमा एरोडायनामिक चाके वापरते, जी रेंज वाढवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. यामध्ये मागील बाजूचे टेल लॅम्प आणि बंपर एकाच थीमचे आहेत. (Utility News)

Bestune Xiaoma mini EV starts At 3.5 lakh
Upcoming Cars October 2023 : खुशखबर ! ऑक्टोबरमध्ये लाँच होणार या 3 शानदार कार, वाचा संपूर्ण यादी

किती आहे रेंज?

बेस्टून शाओमा एफएमई प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. यामध्ये ईव्ही आणि रेंज एक्स्टेन्डर डेडिकेटेड चेसिसचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी, या प्लॅटफॉर्मवर NAT नावाची राइड-हेलिंग ईव्ही तयार करण्यात आली होती. FME प्लॅटफॉर्ममध्ये A1 आणि A2 असे दोन उप-प्लॅटफॉर्म आहेत.

A1 उप-प्लॅटफॉर्म 2700-2850 मिमी चा व्हीलबेस असलेल्या सबकॉम्पॅक्ट आणि कॉम्पॅक्टची पूर्तता करते. A2 चा वापर 2700-3000 मिमी व्हीलबेस असलेल्या कारसाठी केला जातो. या आकारची रेंज 800Km इतकी असून Extender मॉडेलची रेंज 1200Km हून अधिक आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com