Avoid Vomiting Tips
Avoid Vomiting TipsSaam Tv

Prevent Travel Sickness: तुमच्याही मुलांना कार आणि बसमध्ये उलट्या होतात? तर करा 'हे' उपाय

How to Prevent Vomiting While Traveling: तुमच्याही मुलांना कार आणि बसमध्ये उलट्या होतात? तर करा 'हे' उपाय
Published on

4 Ways To Prevent Travel Sickness:

जेव्हाही आपण आपल्या कुटुंबासोबत सहलीला किंवा गावी जातो, तेव्हा स्वतःची काळजी घेण्याव्यतिरिक्त आपल्याला सर्वात जास्त काळजी कोणाची घ्यायची असेल तर ती म्हणजे लहान मुलांची. खरे तर लहान मुलांचे जेवण, त्यांची झोप इत्यादींबाबत खूप काळजी घ्यावी लागते. त्याच वेळी, जेव्हा ते सहलीला जातात तेव्हा मुलांमध्ये सर्वात सामान्य समस्या दिसून येते ती म्हणजे उलट्या होणं.

अनेक मुलांना कारने किंवा बसने प्रवास करतात उलट्या होतात. ही समस्या तुमच्या मुलालाही होते का? जर होय, तर यासाठी काय उपाय करायला हवेत, याचबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.

Avoid Vomiting Tips
LIC Schemes: LIC च्या 'या' योजनेत फक्त एकदाच जमा करावे लागतील पैसे, आयुष्यभर मिळेल 50,000 रुपये पेन्शन

करा हे उपाय

1. जर तुमची मुले प्रवासात करताना कार किंवा बसमध्ये मोबाईल फोन पाहत असतील तर, त्यांना उलट्या होऊ शकतात. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या मुलांना झोपायला सांगू शकता. प्रवासादरम्यान मुले झोपली तर ते त्यांच्यासाठी चांगले ठरू शकते. यामुळे त्यांना ते उलट्या होण्याची समस्या टाळू शकतात.  (Latest Marathi News)

2. अनेक वेळा पालकांच्या चुकीमुळे मुलांना उलट्या होतात, कारण ते आपल्या मुलांना प्रवासापूर्वी किंवा प्रवासादरम्यान खूप जास्त अन्न खायला देतात. हे टाळा आणि मुलांना फक्त हलक्या गोष्टी खायला द्या. ही पद्धत उलट्या थांबवण्यास देखील उपयुक्त ठरू शकते. (Utility News)

Avoid Vomiting Tips
Government Schemes: मुलींसाठी जबरदस्त 5 सरकारी योजना; शिक्षणापासून लग्नापर्यंत, कधीही पैशाची कमतरता भासणार नाही...

3. कार आणि बसमध्ये मुलांना उलट्या होण्याचे मुख्य कारण म्हणजे सफोकेशन. कार-बस बंद असली आणि त्यात वेंटिलेशनची व्यवस्था नसली तरी डोके दुखते आणि कधी कधी उलट्याही होतात. त्यामुळे कार किंवा बसमध्ये एसी चालू करा किंवा खिडक्या उघड्या ठेवा आणि मुलांना बाहेर बघायला सांगा.

4. अनेक वेळा मुले कार किंवा बसमध्ये शांतपणे बसून राहतात, ज्यामुळे उलट्या देखील होतात. त्यामुळे मुलांशी बोला, गाणी वाजवा, त्यांच्यासोबत मजा करा इ. सोबतच काही अडचण आल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

महत्वाचं: या बातमीत फक्त सामान्य माहिती दिली आहे. साम टीव्ही किंवा लेखक कोणतेही दावे करत नाहीत किंवा त्याचे समर्थन करत नाहीत. हे अंमलात आणण्यापूर्वी तुम्ही डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com