Hyundai ची नवीन इलेक्ट्रिक कार, फक्त 18 मिनिटात होणार चार्ज; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Hyundai Ioniq 5 N: Hyundai ची नवीन इलेक्ट्रिक कार, फक्त 18 मिनिटात होणार चार्ज; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
Hyundai Ioniq 5 N
Hyundai Ioniq 5 NSaam Tv
Published On

Hyundai Ioniq 5 N:

Hyundai आपली नवीन EV कार Hyundai Ioniq 5 N लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ही कार 84kWh च्या पॉवरफुल बॅटरी सेटअपसह येऊ शकते. ही नवीन जनरेशन कार अवघ्या 18 मिनिटांत 10 ते 80 टक्के चार्ज होईल. कंपनीने नुकतेच आपल्या कारचे अनावरण केले आहे. जागतिक बाजारपेठेनंतर Hyundai Ioniq 5 N भारतात लॉन्च होईल, असा अंदाज आहे. ही स्टायलिश कार ड्युअल मोटरसह 478kW चा पॉवर देईल.

3 सेकंदात पकडेल 60 kmph चा वेग

या कारला 8 स्पीड ड्युअल क्लच ट्रान्समिशन मिळेल. यात डॅशिंग फ्रंट लुक असेल. या कारला 21 इंची मोठी व्हील्स देण्यात येणार आहेत. कारमध्ये यूएसबी-सी पोर्ट, वायरलेस चार्जर, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि डिजिटल डिस्प्ले असेल. कार 0 ते 60 किमी प्रतितास 3.25 सेकंदात वेग पकडेल. सध्या कंपनीने या कारच्या लॉन्च डेट आणि डिलिव्हरीच्या तारखेबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. यात ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मिळेल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Hyundai Ioniq 5 N
Xiaomi घेऊन येत आहे जबरदस्त कार, कमी किंमतीत मिळणार लक्झरी फीचर्स; जाणून घ्या किंमत

कारमध्ये मिळेल एक प्रकार आणि तीन रंग पर्याय

सध्या Hyundai IONIQ 5 बाजारात उपलब्ध आहे. ही कार 5 सीटर कार आहे, या SUV मध्ये 584 लीटरची बूट स्पेस आहे. ही कार 50kW क्षमतेच्या चार्जरने एका तासात चार्ज होते. कंपनी या कारची एक्स-शोरूम किंमत 45.95 लाख रुपये ठेवली आहे. (Latest Marathi News)

कारमध्ये एक प्रकार आणि तीन रंगांचे पर्याय उपलब्ध आहेत. ही कार एका चार्जवर 631 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते. कारमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आले आहे. IONIQ 5 मध्ये 72.6 kWh चा बॅटरी पॅक आहे. कारला 214.56 bhp पॉवर मिळते. 11 kW AC चार्जरने कार 6 तास 55 मिनिटांत पूर्ण चार्ज होते.

Hyundai Ioniq 5 N
7 Seater Cars: मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट आहे 'ही' कार, मिळत आहे मोठी सूट; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

ही 5 सीटर कार आहे. ही कार बाजारात Volvo XC40 Recharge आणि Kia EV6 शी स्पर्धा करते. सेफ्टीसाठी कारमध्ये सहा एअरबॅग्ज आहेत. यात 12.3-इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. कारमध्ये वायरलेस फोन चार्जर आणि ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल उपलब्ध आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com