थंडीचे दिवस सुरु झाले असून संपूर्ण देशात नागरिकांना हु़डहुडी भरलीये. महाराष्ट्रातील अनेक भागांत पारा घसरला असून वातावरण गार आहे. थंडीच्या या दिवसांमध्ये आजारांच्या प्रमाणात देखील वाढ होते. हिवाळ्याच्या दिवसांत कशी काळजी घेतली पाहिजे हे जाणून घेऊया.
सध्या थंडीच्या वातावरणात गारवा जाणवत असून सगळीकडे धुक्यांची चादर पसरलीये. या दिवसांमध्ये उन्हाच्या उकाड्यापासून आराम मिळतो. मात्र हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्याची विशेष काळजी घेणं महत्त्वाचं आहे. थंडी चालू झाल्यानंतर सगळीकडे आजार पसरू लागतात. शिवाय या दिवसांमध्ये साथीचे आजार वेगाने पसरतात. त्यामुळे थंडी चालू झाल्यानंतर जीवनशैलीमध्ये आणि खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये बदल करणं महत्त्वाचं असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
यासंदर्भात मुंबईतील डॉ. योगेश दळवी म्हणाले की, थंडी चालू झाल्यानंतर वातावरणात गारवा जाणवू लागतो. सध्या मुंबईत असं वातावरण दिसून येतंय. या गारव्यामुळे शरीरातील ऊर्जा कमी होऊ लागते. परिणामी शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम होते. ही रोगप्रतिकार शक्ती कमी झाली आजारपण वाढू लागतं.
या दिवसांमध्ये डेंग्यू, मलेरिया, फ्लू, ताप, सर्दी, खोकला या आजारांचं प्रमाण वाढतं. यामुळे आरोग्याची योग्य ती काळजी घेतली पाहिजे. अशा दिवसांमध्ये थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे, पोषण आहार आणि चांगली विश्रांती घ्यावी, असंही डॉ. दळवी यांनी सांगितलं आहे.
थंडीच्या दिवसांमध्ये जर तुम्ही कुलरचा वापर करत असाल तर तसं करू नका. यामुळे थंडी आणखी वाढण्याची शक्यता असते. या वातावरणात राहिल्यामुळे सर्दी, ताप, खोकला होण्याचा धोका असतो. त्यामुळे कुलर ऐवजी पंख्याचा वापर केला पाहिजे.
हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी आणि थंडीपासून बचाव करण्यासाठी चांगले लोकरीचे कपडे घाला. या दिवसांमध्ये प्रवास करताना तुमच्यासोबत जॅकेट, श्रग किंवा कार्डिगन ठेवा. जेणेकरुन जेव्हा तापमान कमी झाल्यावर तुम्ही त्याचा वापर करू शकाल. थंडीपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी कधीही आवश्यकतेपेक्षा जास्त लोकरीचे कपडे घालू नका. असं केल्याने शरीरातील रक्ताभिसरणावर परिणाम होऊ शकतो.
दमा किंवा श्वासोच्छवासाच्या आजारांनी त्रस्त असलेल्यांनी सकाळी घराबाहेर न जाता हलका सूर्यप्रकाश असेल तेव्हाच फिरायला जावं. सकाळच्या थंड हवेमुळे श्वसनमार्गात समस्या वाढू शकतात, ज्यामुळे हृदयरोग्यांच्या समस्या वाढू शकतात.
कोणत्याही ऋतुमध्ये पाणी पिणं हे फार गरजेचं आहे. प्रत्येक ऋतुमध्ये तुमचं शरीर हायड्रेट राहणं फार गरजेचं आहे. उन्हाळ्यात शरीराला पाण्याची आवश्यकता असते त्याचप्रमाणे हिवाळ्यात सुद्धा असते. त्यामुळे पाण्याचे भरपूर सेवन करणं तुमच्या शरीरासाठी महत्त्वाचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.