Best Sleeping Position SAAM TV
लाईफस्टाईल

Dry Fruit Storage Tips : महागडा सुकामेवा पावसाळ्यात नरम होता? 'असे' ठेवा ड्रायफ्रुट्स फ्रेश

Monsoon Kitchen Tips : पावसाळ्यात महागडा सुकामेवा अशाप्रकारे स्टोअर करा. जेणेकरून तो नरम होणार नाही. कारण पावसाळ्यात आरोग्य चांगले राहण्यासाठी ड्रायफ्रुट्स महत्त्वाचे असतात.

Shreya Maskar

पावसाळयात वातावरणातील आर्द्रतेमुळे आणि ओलाव्यामुळे अनेक पदार्थ खराब होतात. त्यामध्ये ड्रायफ्रुट्सचा देखील समावेश असतो. पावसाळ्यात काजू, पिस्ता, बदाम, अक्रोड नरम होण्याची संख्या वाढते. पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते. त्यामुळे अनेक लोक डाएटमध्ये सुकामेव्याचा समावेश करतात. पण पावसाळयात ड्रायफ्रुट्स लवकर नरम होऊन खराब होतात. असे होऊ नये म्हणून पावसाळ्यात ड्रायफ्रुट्स अशाप्रकारे स्टोअर करा.

'या' गोष्टी लक्षात ठेवा

  • पावसाळ्यात ड्रायफ्रुट्सची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण दमट वातावरणामुळे ड्रायफ्रुट्स खराब होण्याची शक्यता जास्त असते.

  • पावसाळ्यात ड्रायफ्रुट्स कधीही हवाबंद डब्यात ठेवा.

  • सुकामेवा महाग असल्यामुळे आपण तो जास्त प्रमाणात स्टोर करतो. पण पावसाळ्यात ड्रायफ्रुट्स खराब होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे एका मर्यादेपर्यंत ड्रायफ्रुट्स विकत घ्यावे.

  • तसेच कधीही सुकामेवा खरेदी करताना त्याचा दर्जा पाहावा. नेहमी ताजा आणि फ्रेश सुकामेवा विकत घ्यावा.

  • सुकलेला आणि जुना सुकामेवा खरेदी केल्यास तो दीर्घकाळ टिकत नाही. त्यामुळे गरजेपुरताच सुकामेवा खरेदी करावा.

फ्रिजमध्ये स्टोअर करा

पावसाळ्यात फ्रिजमध्ये तुम्ही अधिक काळ ड्रायफ्रुट्स स्टोअर करून ठेवू शकता. मात्र यासाठी तुम्ही हवाबंद पिशव्या आणि डब्यांचा वापर करा. बाहेर जास्त ओलसर ठिकाणी सुकामेवा ठेवल्यास त्याला किड किंवा बुरशी लागण्याची शक्यता जास्त असते.

ड्रायफ्रुट्स रोस्ट करा

पावसाळ्यात ड्रायफ्रुट्स जास्त काळ टिकवण्यासाठी भाजून स्टोअर करा. यामुळे ड्रायफ्रुट्सना किड लागणार नाही.

मीठाचा वापर

ड्रायफ्रुट्सची चव वाढवण्यासाठी तुम्ही त्यामध्ये थोडे मीठ देखील घालू शकता. मिठामुळे सुकामेवा जास्त काळ टिकेल.

सुकामेवा वेगळा करा

सुकामेवा वेगवेगळ्या बरणीमध्ये साठवून ठेवा. कधीच एका बरणीमध्ये सर्व प्रकारचे ड्रायफ्रुट्स टाकू नये. करण एक ड्रायफ्रुट्स खराब झाल्यास सर्व सुकामेवा खराब होईल.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात शिवसेना आणि पतित पावन संघटनेची होणार युती

Monday Horoscope: पैशाची महत्वाची कामं पार पडतील, शिव उपासना लाभाची ठरेल; वाचा राशीभविष्य

Maharashtra Politics: ठाकरे कुटुंबियांची सुरक्षा धोक्यात? मातोश्री'बाहेर ड्रोनच्या घिरट्या

धक्कादायक! 300 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज समुद्रात बुडाले, शेकडो बेपत्ता

Forest Department Fails To Control Leopard: बिबट्याची दहशत, प्रशासनाचं अपयश, स्वरक्षणासाठी गळ्यात खिळ्यांचे पट्टे

SCROLL FOR NEXT