मुंबईच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून काही क्षण निवांत वेळ घालवण्यासाठी कोकणची सफर करा. कोकणात दडलेल निसर्ग सौंदर्य अनुभवा. आपल्या प्रियजनांसोबत लांब समुद्रकिनार्याची सफर करा. पावसाळ्यात कोकणात जात असाल तर 'या' बेस्ट पिकनिक स्पॉटला आवर्जून भेट द्या.
मिठमुंबरी बीच
कोकणातील मिठमुंबरी बीच हा अतिशय स्वच्छ आणि शांत समुद्रकिनारा आहे. हा समुद्रकिनारा कुणकेश्वर पासून जवळ आहे. पावसाळ्यात तुम्ही येथे मनसोक्त आनंद लुटू शकता. सूर्यास्त पाहण्यासाठी लोक येथे आवर्जून येतात. निसर्गाचे अद्भूत सौंदर्य पाहून त्यांचे मन मोहून जाते. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात मिठमुंबरी बीच येतो. चमकणारी वाळू आणि निळाशार समुद्र हे मिठमुंबरी बीचचे वैशिष्ट्य आहे.
तांबळडेग
निसर्गाचा सुंदर देखावा म्हणजे तांबळडेग गाव होय. सकाळचे दृश्य पाहण्यासाठी येथे अनेक लोक येतात. उत्साह, एनर्जीसाठी पर्यटक येथे आवर्जून येतात. तुम्ही पावसाळ्यात कुटुंबासोबत पिकनिकसाठी या ठिकाणाला भेट देऊ शकता. येथे मोठ्या प्रमाणात सुरुची बने आढळून येतात. उंच आकाशात भरारी घेणारे पक्षी पाहून मन आनंदाने भरून जाते. येथे असलेला समुद्रकिनारा शुद्ध हवेसाठी प्रसिद्ध आहे.
देवगड किल्ला
देवगड म्हटलं की, प्रसिद्ध हापूस आंबा आला. देवगड हे पर्यटकांचे आकर्षण आहे. सूर्यास्त- सूर्योदयाचे मोहक रुप पाहण्यासाठी देवगड किल्ल्यावर पर्यटकांची येथे गर्दी होते. देवगडला राहण्यासाठी आणि खाण्यापिण्यासाठी हॉटेल्सचा रंगा आहेत. किल्ल्याची तटबंदी, गणपती मंदिर, किल्ल्यावरील तोफा, विहीर पाहण्यासाठी लोक येथे येतात.
कुणकेश्वर बीच
कोकणातील कुणकेश्वर बीचला भेट दिल्यावर कुणकेश्वर मंदिराचा कळस आपले लक्ष वेधून घेतो. कुणकेश्वर मंदिर येथील प्रसिद्ध देवस्थान आहे. येथे महादेवाचे मंदिर आहे. कुणकेश्वर बीच फोटोशूटसाठी प्रसिद्ध आहे. कोकणात आल्यावर पर्यटक आवर्जून कुणकेश्वर बीचला भेट देतात. फेसाळलेला समुद्र डोळ्यांचे पारणे फेडतो.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.