Garlic Benefits saam tv
लाईफस्टाईल

Garlic Benefits: सकाळची ही छोटी सवय बदलेल तुमचं आरोग्य! हार्ट अटॅक, डायबेटीजचा अन् कोलेस्ट्रॉलवर घरगुती उपाय

Home Remedies: सकाळी रिकाम्या पोटी एक लसणाची पाकळी खाल्ल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढते, पचन सुधारते, कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते आणि शरीराचे नैसर्गिक डिटॉक्स होऊन ऊर्जा वाढते. हा उपयुक्त आरोग्य उपाय जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

लसूण रोगप्रतिकारकशक्ती वाढवतं आणि जंतू-विषाणूंपासून शरीराचे संरक्षण करतो.

हार्टचे आरोग्य सुधारून कोलेस्ट्रॉल व रक्तदाब नियंत्रणात ठेवतो.

पचनशक्ती वाढवून अपचन, गॅस आणि पोट फुगीच्या समस्या कमी करतो.

लसूण हा स्वयंपाक घरातील आणि चमचमीत पदार्थांचा एक साथीदार आहे. बऱ्याच जणांना लसणाचे विविध पदार्थ प्रचंड आवडतात. पण लसूण फक्त चव वाढवण्याचं नाही तर तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर मानला जातो. पुढे आपण त्याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.

लसूण खायला सुरुवात केल्यावर सर्वात आधी आपल्या रोगप्रतिकारकशक्तीमध्ये होणारा बदल दिसतो. लसूणामध्ये असलेले अ‍ॅलिसिन हा घटक जंतू, विषाणूंना लांब ठेवण्याचा प्रयत्न करतो. हवामानात बदल असो किंवा सर्दी-खोकल्याचा हंगाम असो, शरीर आजारी पडण्याची शक्यता कमी होते. नैसर्गिक 'Qअँटिबायोटिक' म्हणून लसूण शरीराचं संरक्षण करतो आणि त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.

हार्टच्या आरोग्यासाठी लसूण फायदेशीर मानला जातो. नियमित सेवन केल्यास वाईट कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते, रक्तदाब नियंत्रित राहतो आणि रक्तप्रवाह सुरळीत राहतो. त्यामुळे हार्ट अटॅक कमी करण्यास लसूण मोठी भूमिका बजावतो. हे सगळं औषधांशिवाय नैसर्गिकरीत्या घडतं, ही विशेष गोष्ट आहे.

रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्यावर पचनशक्तीही सुधारते. लसूण पित्ताचे स्त्रवण वाढवतो. त्यामुळे फॅट्स पचण्यास मदत होते आणि पोषक घटकांचे शोषण जास्त प्रभावीपणे होते. यामुळे पोटातील अपचन, गॅस आणि पोट फुगीच्या समस्या कमी होऊ शकतात. शरीरातील लिव्हर आणि मूत्रपिंड यांना नैसर्गिक डिटॉक्स करण्यात मदत होत असल्याने त्वचा स्वच्छ दिसू लागते आणि दिवसभरात ऊर्जा वाढल्यासारखं वाटतं.

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी लसूण उपयुक्त मानला जातो. त्यातील नैसर्गिक घटक इन्सुलिन सेंसिटिव्हिटी वाढवतात, ज्यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी स्थिर राहते. वजन कमी करण्याच्या प्रयत्नांमध्येही लसूण छोटी पण महत्त्वाची भूमिका बजावते. मेटाबॉलिझम वाढवणं, पाण्याची सूज कमी करणं आणि भूक नियंत्रित ठेवणे यामुळे वजन व्यवस्थापन अधिक सोपं होतं. अर्थात, फक्त लसूण खाल्ल्याने वजन कमी होत नाही पण योग्य आहार आणि व्यायामाबरोबर तो शरीराला साथ देतो.

थोडक्यात, सकाळी रिकाम्या पोटी एक लसणाची पाकळी खाण्याची साधीशी सवय शरीराच्या प्रतिकारशक्तीपासून ते पचन आणि रक्तदाबापर्यंत अनेक गोष्टींवर सकारात्मक परिणाम करतं. मात्र ज्यांना आम्लपित्त, पोटदुखी किंवा काही विशिष्ट आरोग्य समस्या आहेत त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच ही सवय सुरू करावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरेंच्या मनसेचे २ उमेदवार गायब? राजकीय वर्तुळात खळबळ

कल्याणमध्ये मोठी राजकीय घडामोड; दोन दिग्गज नेत्यांची एकत्र बैठक, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

ऐन निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; बड्या नेत्याचा शिवसेनेला 'जय महाराष्ट्र'

Ladki Bahin eKYC: थर्टी फर्स्टची डेडलाईन तरी ई-केवायसी सुविधा सुरूच; लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक घोळ?

Friday Horoscope : नव्या वर्षाचा पहिला शुक्रवारी ठरेल लकी; जुळणार प्रेमाच्या रेशीम गाठी, ५ राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार

SCROLL FOR NEXT