Nachni Bhakri Tips: नाचणीची भाकरी थापताना तुकडे पडतात? शेकल्यावर लगेचच कडक होते? "ही" घ्या भाकरीची परफेक्ट रेसिपी

Sakshi Sunil Jadhav

नाचणीची भाकरी

नाचणीची भाकरी पौष्टिक आणि आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त मानली जाते. मात्र, अनेकांना ती थापताना तुकडे पडणे, भाकरी फुटणे किंवा शिजल्यानंतर वातड होणे अशी समस्या येते.

nachni bhakri recipe

पीठ ताजं असलं पाहिजे

नाचणीचे पीठ जुने असेल तर भाकरी थापताना तुकडे पडतात. ताजे आणि बारीक भरडलेले पीठ वापरा.

ragi roti recipe

पाणी उकळते गरम वापरा

नाचणीची भाकरी नेहमी उकळत्या पाण्यात भिजवलेल्या पिठातूनच छान होते. गरम पाणी वापरल्याने भाकरी मऊ आणि कमी फुटणारी होते.

soft nachni bhakri tips

पिठात पाणी योग्य प्रमाणात

अतिशय घट्ट किंवा अतिशय सैल पीठ भाकरीला योग्य आकार देत नाही. हाताला चिकटत नाही आणि गुळगुळीत वाटेल अशा मिक्सलाच उत्तम माना.

soft nachni bhakri tips

घोळ व्यवस्थित मळा

गरम पाणी घातल्यानंतर पीठ एक मिनिट झाकून ठेवा आणि मग नीट मळा. पिठाला लवचिकता मिळते आणि भाकरी फुटत नाही.

soft nachni bhakri tips

थापताना हात ओले करा

नाचणीचे पीठ कोरडे असल्याने थापताना हात आणि प्लास्टिक/प्लेट हलक्या पाण्याने ओलसर ठेवा. भाकरी गोल आणि मऊ होते.

soft nachni bhakri tips

तवा योग्य तापमानावर असावा

खूप गरम तवा असेल तर भाकरी लगेच भाजते पण फुगत नाही. कमी गरम तव्यावर भाकरी कठीण होते. मध्यम आचेवर भाकरी सर्वोत्तम फुगते.

soft nachni bhakri tips

पलटण्याची योग्य वेळ

भाकरीच्या कडा कोरड्या दिसायला लागल्या कीच पलटा. खूप लवकर किंवा उशिरा पलटल्यास भाकरी वातड होते.

soft nachni bhakri tips

गॅसवर फुगवण्याची पद्धत

एक बाजू व्यवस्थित शिजल्यावर भाकरी सरळ गॅसवर भाजून फुगवा. यामुळे भाकरी मऊ व लुसलुशीत होते.

soft nachni bhakri tips

गरम ठेवण्याची पद्धत

भाकरी भाजल्यावर लगेच झाकणात ठेवा जेणेकरून तिचे ओलसरपण टिकून राहील आणि ती कडक होणार नाही.

soft nachni bhakri tips

NEXT: Wednesday Horoscope: ४ राशींच्या व्यक्तींच्या व्यवसायात प्रगती, आर्थिक लाभाची शक्यता; वाचा बुधवारचे राशीभविष्य

येथे क्लिक करा