Dussehra 2023 Saam tv
लाईफस्टाईल

Dussehra 2023 : या राशींसाठी दसरा ठरेल शुभ, होईल भाग्योदय; नवीन काम करण्याची मिळेल संधी

Dussehra 2023 Date : नवरात्रीचा उत्सव सुरु झाला असून २४ ऑक्टोबरला त्याची सांगता होईल.

कोमल दामुद्रे

Dussehra 2023 Horoscope :

साडे तीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा दसरा. आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील तिथीला दसरा साजरा केला जातो. नवरात्रीचा उत्सव सुरु झाला असून २४ ऑक्टोबरला त्याची सांगता होईल. दसऱ्याच्या दिवशी देवी अपराजिताची पूजा करुन सायंकाळी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. दसरा हा अर्धमावर धार्मिकतेच्या विजयाचे प्रतीक मानले जाते.

विजया दशमीच्या दिवशी देवी सरस्वतीचे पूजन केले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या विशिष्ट वेळेनुसार संक्रमण करत असतात. त्यामुळे प्रत्येक राशीवर त्याचा परिणाम होत असतो. नुकतेच मोठ्या ग्रहांचे संक्रमण झाल्यामुळे ५ राशींसाठी यंदाचा दसरा अतिशय शुभ ठरणार आहे. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. मेष:

या राशींसाठी यंदाचा दसरा (Dussehra) अतिशय शुभ ठरणार आहे. दसऱ्याच्या दिवशी अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे (Money) मिळतील. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल.

2. वृषभ :

नवीन काम सुरु करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस आहे. बॉस तुमच्या खुश राहिल. अडकलेली कामे मार्गी लागतील. पद आणि प्रतिष्ठा वाढेल. मेहनतीचे फळही मिळेल. पगारात वाढ होण्याची शक्यता, आर्थिक स्थिती मजबूत होईल. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल.

3. कन्या :

आरोग्य (Health) चांगले राहिल. लवकरच तुमच्या कामाचे कौतुक होईल. विवाहित महिलांना लवकरच आनंदाची बातमी मिळेल. कीर्ती आणि वैभवात वाढ होण्याची शक्यता आहे.

4. धनु:

नशिबाची तुम्हाला साथ मिळेल. कोणतेही काम करताना यश मिळेल. समाजात मान सन्मान वाढेल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा दिवस शुभ आहे.

5. कुंभ:

मन प्रसन्न राहिल. कौटुंबिक जीवन सुखकर राहील. नवीन काम करण्याची आवड निर्माण होईल. लांबचा प्रवास कराल. मित्रांकडून भेट वस्तू मिळेल.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: शेंद्रा एमआयडीसीत मोठा अपघात, कंपनीतील बॉयलर कोसळून ४ कामगार दगावल्याची भीती

Sanjay Raut : मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार; संजय राऊत यांचा दावा

Maharashtra Election : राज ठाकरेंना नांदगावमध्ये धक्का; मनसे उमेदवाराची निवडणुकीतून माघार, ठाकरे गटात प्रवेश

Maharashtra Election: नाशिकमध्ये भाजप - ठाकरे गटात राडा; पोलीस ठाण्याबाहेरच आमनेसामने, VIDEO

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव – "रुखवत" लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

SCROLL FOR NEXT