Masala Cashew Nuts Saam TV
लाईफस्टाईल

Masala Kaju Recipe: चहा बिस्कीट खाऊन कंटाळा आलाय? मग चटपटीत 5 मिनिटांत बनणारे काजू एकदा ट्राय तर करा

Masala Cashew Recipe in Marathi: धुतलेले काजू सुक्या कापडाने थोडे कोरडे करून घ्या. काजू पूर्ण कोरडे झाल्यानंतरच रेसिपी बनवण्यास सुरुवात करावी.

Ruchika Jadhav

सकाळी सकाळी मुड फ्रेश व्हावा यसाठी प्रत्येक व्यक्ती चहा पितात. चहा प्यायल्याने मुड एकदम रिफ्रेश होतो. सकाळची भूक देखील लागते त्यामुळे काही जण चहाबरोबर बिस्कीट किंवा टोस्ट अशा गोष्टी खातात. मात्र दररोज पीठ, मैदा यांपासून बनवलेले पदार्थ खाऊन कंटाळा येतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला चहाची चव दुप्पट वाढवतील अशी काजूची रेसिपी सांगणार आहोत.

साहित्य

  • 250 ग्राम काजू

  • पुदिना

  • चाट मसाला

  • सैंधव मीठ

  • बटर

कृती

  • आधी तुम्ही घेतलेले काजू स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर ते साफ करा आणि पुन्हा एकदा धुवून घ्या.

  • धुतलेले काजू सुक्या कापडाने थोडे कोरडे करून घ्या. काजू पूर्ण कोरडे झाल्यानंतरच रेसिपी बनवण्यास सुरुवात करावी.

  • त्यासाठी आधी एका पातेल्यात बटर वितळवून घ्या. त्यानंतर यात काजू टाका आणि छान परतून घ्या.

  • त्यावर थोडं सैंधव मीठ टाका. तसेच ओव्हन प्री हिट होण्यासाठी ऑन करा. पुढे त्यावर काजू 10 मिनिटांसाठी बेक करून घ्या.

  • त्यानंतर काजू बाहेर कडल्यावर त्यावर चाट मसाला आणि पुदिना चटणी लावा. अशा पद्धतीने तयार झाली तुमची बेक चटपटीत काजू रेसिपी.

  • तुम्ही घरी पाहुणे आपल्यावर त्यांना देखील ही स्वादिष्ट डिश खण्यासाठी देऊ शकता. अगदी लहान मुलांना देखील हे चटपटीत काजू फार आवडतील. अशा पद्धतीने बनवलेले काजू पुदिना चटणी न लागल्यास आठ दिवस चांगले राहतात.

  • फक्त हे काजू एका काचेच्या बरणीत भरून ठेवा. विविध कोल्ड ड्रिंक्स सोबत देखील हे काजू फार छान लागतात. तुम्हाला काजूची भाजी बनवायची असेल तेव्हा देखील तुम्ही असेच काजू वापरू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

Crime News: पुण्यात टोळी युद्धाचा भडका, आंदेकर विरुद्ध कोमकर गँगवॉरला सुरुवात

SCROLL FOR NEXT