Ruchika Jadhav
काजू मसाला रेसिपी कोकणासह राज्यातील अन्य व्यक्तींना देखील फार आवडते.
सुका मेवामधील फक्त काजू याच फळाजी भाजी बनवली जाते.
त्यासाठी पाव किलो किंवा तुमच्या आवडीनुसार काजू आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.
त्यानंतर एका पॅनमध्ये थोडं तेलं टाकून काजू चांगले खरपूस भाजून घ्या.
एक कांदा, टोमॅटो, अद्रक, लसून थोडं सुकं खोबरं देखील भाजून घ्या.
काजूची भाजी बनवताना गरम मसाला देखील महत्वाचा आहे. गरम मसाला देखील बारीक करून घ्या.
त्यानंतर ३ पळी तेल टाकून मसाल्यांना चांगली फोडणी द्या. मसाल्याला तेल सुटल्यावर त्यात काजू टाका.
तयार झाली तुमची कोकणी स्टाईल काजू मसाला रेसिपी.