Drinking Water Saam Tv
लाईफस्टाईल

Drinking Water: पाणी प्यायल्यानंतरही सारखीच तहान लागते? असू शकतात गंभीर आजाराची लक्षणे

Frequent Thirst even after Drinking Water Symtoms: अनेकदा आपल्याला पाणी प्यायल्यानंतरही वारंवार तहान लागते. वारंवार तहान लागणे ही गंभीर आजाराची लक्षणे असू शकतात.

Siddhi Hande

शरीराला पाण्याची खूप गरज असते. दिवसाला २ ते ३ लिटर पाणी पिणे गरजेचे असते. पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते. त्यामुळे कोणतेही आजार होत नाही. मात्र, जर तुम्हाला पाणी प्यायल्यानंतरही सारखीच तहान लागत असेल तर त्यामागे काही कारणे असू शकतात. पाणी प्यायल्यावर तुमची तहान भागायला हवी. परंतु असं होत नसेल तर तुमच्या शरीरात काही बदल होत असतील.

अनेकदा पाणी प्यायल्यानंतर जर तहान भागत नसेल तर यामागे बदलते हवामान, घाम किंवा थकवा ही कारणे असू शकतात.परंतु हे सारखे होत असेल तर तुम्ही डॉक्टरांकडे जायला हवे.

जर तुम्हाला वारंवार लघवी येत असेल, तोंड सुकत असेल याचसोबत थकवा जाणवत असेल तर याकडे आजिबात दुर्लक्ष करु नका. यामुळे आजार होऊ शकतात.

वारंवार तहान लागणे असू शकते या आजाराचे लक्षण

वारंवार तहान लागण्याचे मुख्य कारण असू शकते डायबिटीज मेलिटस. शरीरात जास्त प्रमाणात रक्त वाढल्याने पाणी बाहेर पडते. यामुळे तहान लागते. याचसोबत डायबिटीज इन्सिपिडसमध्ये होर्मोन्सची कमी असल्यानंतरही सारखी तहान लागू शकते.

तहान लागण्यामागे डिहायड्रेशनदेखील एक कारण असू शकते. यामध्ये उलटी किंवा जास्त घाम येतो. याचसोबत किडनीचा त्रास असेल तेव्हादेखील शरीरात पाण्याची कमी असते. त्यामुळे तहान लागते. थायरॉइडमध्येदेखील काही गोळ्यांच्या परिणामांमुळे वारंवार तहान लागू शकते.

अशा प्रकारे घ्या काळजी

या आजारांपासून वाचण्यासाठी तुम्हाला मोजकेच पाणी प्यायला हवे. दिवसभरात थोड्या-थोड्या अंतराने पाणी प्यायला हवे. जास्त गोड आणि कॉफीयुक्त पदार्थ खाऊ नका. आहारात फळे आणि पालेभाज्यांचा समावेश करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black Tea Benefits: महिनाभर रोज एक कप कोरा चहा प्यायल्याने शरीरावर काय परिणाम होतो?

Black spots on onion: कांद्यावरील काळे डाग ठरू शकतात धोक्याची घंटा; खाण्यापूर्वी या गोष्टी तपासा

Maharashtra News Live Update: बी.कॉम.च्या कथित बनावट पदवी प्रकरणाविरोधात NSUI च्या आंदोलन

Banking News : बँकांनी ग्राहकांच्या खिशातून उकळले ₹२६,१७० कोटी, तुमच्याही खात्यातून बँक पैसे कट करत नाहीये ना?

सर्वात मोठी बातमी! परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर, आता राज्यसभेत 'परीक्षा'

SCROLL FOR NEXT