Manasvi Choudhary
डायबिटीज झाल्यास शरीराची योग्य प्रकारे काळजी घेणे महत्वाचे आहे. डायबिटीज नियंत्रणात आणण्यासाठी तुमचा आहार महत्वाचा आहे.
डायबिटीज असल्यास रक्तातील साखर वाढू नये यासाठी तुम्ही योग्य आहार घेणे आवश्यक आहे.
तांदूळ आणि गहूऐवजी ज्वारी, बाजरी, नाचणी किंवा ओट्स यांचा समावेश करा. यात फायबर जास्त असते.
पालेभाज्या पालक, मेथी, कारले, दुधी भोपळा, काकडी, टोमॅटो, कोबी आणि फ्लॉवर. या भाज्या साखरेचे प्रमाण वाढत नाहीत.
मूग, मटकी, चणे आणि डाळी खा यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
साखर, गूळ, मध, ग्लुकोज कोणत्याही प्रकारच्या मिठाई खाऊ नये.
बिस्किटे, व्हाईट ब्रेड, पास्ता, पिझ्झा आणि बेकरीचे मैद्याचे पदार्थ खाऊ नका.
एकदम पोटभर जेवण्यापेक्षा दिवसातून ५-६ वेळा थोडे थोडे खावे. यामुळे साखर अचानक वाढत नाही.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या