Shreya Maskar
शहाळ्यावर तपकिरी रंगाचे डाग असतील तर असा नारळ विकत घेऊ नका. कारण डाग हे जास्त पिकल्याचे लक्षण आहे, म्हणजे त्यात पाणी कमी आहे.
गोल नारळची निवड करा. कारण नारळ जसजसा पिकतो तसा त्याचा आकार लांब होतो. मोठ्या नारळात पाण्याचे प्रमाण कमी असल्याने नेहमी गोल आकाराचे नारळ निवडा.
हिरव्या आणि ताज्या नारळात जास्त पाणी असते , त्यामुळे तो हलवल्यावर आवाज येत नाही. त्यामुळे नारळ खरेदी करताना तो नीट हलवून पाहा.
ताज्या हिरव्या नारळाला/ शहाळ्याला कोणत्याही प्रकारचा वास येत नाही. जर तुम्ही खरेदी केलेल्या शहाळ्याला वास येत असेल तर तो खराब आहे.
आपण जास्तीच्या उद्देशाने मोठे शहाळे खरेदी करतो, जे चुकीचे आहे. कधीही शहाळे मध्यम आकाराचे निवडावे. जास्त छोटे देखील निवडू नये.
जो नारळ जड असतो आणि हलवल्यावर आवाज येत नाही, त्यात मलाई जास्त असते. जर तुम्हाला मलाई हवी असेल तर अशा नारळाची निवड करा.
जो नारळ हलवल्यावर मोठा आवाज येतो आणि वजनाने हलका असतो, त्यामध्ये जास्त पाणी असते. व्यायाम केल्यावर शहाळ्याचे पाणी आवर्जून प्या.
चॉकलेटी रंगाचे किंवा खूप हलके शहाळे खरेदी करणे टाळावे, कारण त्यात पाणी कमी असते. नारळ जुना झालेला असू शकतो.