Shreya Maskar
हनुवटी आणि ओठांच्या वर असलेले केस काढण्यासाठी वॅक्सिंग, थ्रेडिंग केल्याने, केसांची वाढ लवकर होते. आणि त्वचा अधिक कोरडी होते. त्यामुळे हे करणे वेळीच थांबवा.
हनुवटीवरील केस काढण्यासाठी एक फेस पॅक तयार करा. यासाठी बटाटा, मसूर डाळीची पेस्ट, मध, लिंबू रस इत्यादी साहित्य लागते. तुम्ही याचे योग्य प्रमाण घ्या.
मिक्सरला बटाटा, मसूर डाळ, मध, लिंबूचा रस टाकून एक पेस्ट बनवून घ्या. यात तुम्ही गुलाब पाणी देखील टाकू शकता. फक्त फेस पॅक जास्त पातळ होणार नाही, याची काळजी घ्या.
पेस्ट हनुवटीवर आणि हनुवटीच्या खालच्या भागाला लावा. तसेच तुम्ही ओठांच्या वर आणि खाली देखील ही पेस्ट लावा. १५-२० मिनिटे सुकवा. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या.
महिन्यातील २-३ वेळा असे केल्यास हनुवटी-ओठांवरील केसांची वाढ होत नाही. तसेच आपली त्वचा मुलायम दिसत आणि ग्लो देखील करते.
बेसन आणि हळद मिक्स करून पेस्ट बनवा. ओठांवर १५-२० मिनिटे लावून सुकल्यावर धुवा, यामुळे केस बारीक होता. तसेच त्यांची वाढ होत नाही.
मेथी दाणे भिजवून पेस्ट करा, त्यात मध मिसळून १० मिनिटे लावा आणि नंतर धुवा. हनुवटीवर केस येणार नाही. तसेच त्वचा चांगली राहील.
घरगुती कोणतेही प्रोडक्ट चेहऱ्यावर लावताना सर्वात आधी त्याची पॅच टेस्ट करा. कारण आपली त्वचा खूप संवेदनशील असते.