Homemade Face Mask : सुरकुत्या अन् काळ्या डागांना करा बाय बाय, 'या' घरगुती फेस मास्कने ५ मिनिटांत उजळवा त्वचेचे सौंदर्य

Shreya Maskar

घरगुती फेस मास्क

सुरकुत्या, काळे डाग आणि पिंपल्स कमी करायचे असतील तर केळीचा फेस मास्क चेहऱ्याला वाला. केळीतील व्हिटॅमिन ए त्वचेचा कोरडेपणा कमी करतेच. तर व्हिटॅमिन सी त्वचेला चमक आणण्यास आणि काळे डाग कमी करण्यास मदत करते.

Homemade Face Mask | yandex

त्वचेची काळजी

केळीतील अँटिऑक्सिडंट्स मुक्त रॅडिकल्सशी लढतात. त्यामुळे सुरकुत्या आणि चेहऱ्यावरील बारीक रेषा यांसारख्या वृद्धत्वाच्या लक्षणे कमी होतात.

Homemade Face Mask | yandex

मॉइश्चरायझर

केळीमध्ये नैसर्गिक गुणधर्म त्वचा मॉइश्चरायझर करतात. चेहरा मऊ आणि कोमल बनवतात. त्वचा चमकदार ठेवण्यास मदत होते.

Homemade Face Mask | yandex

लिंबाचा रस

केळीच्या फेस मास्क बनवण्यासाठी केळे, मध, लिंबाचा रस किंवा दूध इत्यादी साहित्य लागतात. तुम्ही यात गुलाब पाणी देखील टाकू शकता.

lemon | yandex

टीप

चेहऱ्यावर सुरकुत्या असतील तर दही लावा, काळे डाग असतील तर हळद किंवा कोरफड जेल लावा. तुमची त्वचा कोरडी असेल तर ऑलिव्ह ऑइल किंवा नारळाचे तेल चेहऱ्याला लावा.

Homemade Face Mask | yandex

फेस मास्क कसा बनवावा?

केळी सोलून बाउलमध्ये चांगली मॅश करा. तुमच्या त्वचेच्या गरजेनुसार मध आणि इतर घटक घाला. चांगले मिसळा. चेहरा पूर्णपणे स्वच्छ केल्यानंतर फेस मास्क लावा. तुम्ही हा मास्क मान, हात आणि पायांना देखील लावू शकता.

Homemade Face Mask | yandex

किती वेळ ठेवावे?

केळीचा फेस मास्क १५ ते २० मिनिटे चेहऱ्याला लावल्यावर त्वचा कोमट पाण्याने धुवा आणि कोरडा करा. शेवटी चेहऱ्याला भरभरून मॉइश्चरायझर लावा. महिन्यातून २-३ वेळा असे करा. याची पॅच टेस्ट करा.

Homemade Face Mask | yandex

NEXT : आवडत्या साड्या जुन्या झाल्यात? मग 'असा' करा वापर, पारंपरिक लूकला येईल मॉर्डन टच

Saree | pinterest
येथे क्लिक करा...