Saree : आवडत्या साड्या जुन्या झाल्यात? मग 'असा' करा वापर, पारंपरिक लूकला येईल मॉर्डन टच

Shreya Maskar

एथनिक सूट

जुन्या साडीतून स्वत:साठी एथनिक सूट बनवा. आजकाल साडीचा सूट बनवण्याचा ट्रेंड पाहायला मिळतो. यात तुम्ही वेस्टन आणि पारंपरिक असे दोन्ही लूक करू शकता.

Ethnic Suit | pinterest

अनारकली सूट

अनारकली सूट साडीपासून छान दिसतो. अनारकली ड्रेसला सुंदर घेर देखील येतो. तुम्ही यावर मॅचिंग ओढणी घेऊ शकता. तसेच थोडा नेटचा वापर करा. जेणेकरून ड्रेसला मॉर्डन लूक येईल.

Anarkali Suit | pinterest

फ्लेयर्ड स्कर्ट

साड्यांपासून आवर्जून बनवला जाणारा कपड्यांचा प्रकार म्हणजे फ्लेयर्ड स्कर्ट. गोल्डन किंवा चंदेरी सिल्कची साडी तुमच्याकडे असेल तर, तुम्ही फ्लेअर्ड स्कर्ट बनवू शकता. तुमचा लूक खुलून येईल.

Flared Skirt | pinterest

इंडो वेस्टर्न लूक‌

फ्लेयर्ड स्कर्टमध्ये परफेकट इंडो वेस्टर्न लूक‌ येतो. फॉर्मल शर्ट आणि टॉपसोबत तुम्ही स्कर्ट परिधान करा. तसेच ऑक्सीडाइज्ड ज्वेलरी घाला. जेणेकरून लूक खुलून येईल.

Indo-Western Look | pinterest

पोटली बॅग

पारंपरिक साड्यांवर पोटली बॅग खूपच उठून दिसते. त्यामुळे जुन्या साडीपासून पारंपरिक पोटली बॅग बन‌वा. लग्न समारंभासाठी ही बेस्ट राहील.

Potli Bag | pinterest

टॉप -कुर्ती

साडी नऊवारी असो वा हावारी साडी तुम्ही यांपासून सुंदर टॉप -कुर्ती बनवू शकता. तसेच साडीवर जर फ्लोअर प्रिंट असेल तर क्रॉप टॉप छान दिसेल.

Top - Kurti | pinterest

ओढणी

जॉर्जेट आणि शिफॉन साडीपासून सुंदर ओढणी तयार करू होऊ शकता. तसेच टॉप -कुर्तीवर घालण्यासाठी स्कार्फ बेस्ट ऑप्शन राहील.

Dupatta | pinterest

कुशन कव्हर

कुशन कव्हर बनवण्यासाठी तुम्ही बनारसी साडी, शिफॉन, जॉर्जेटची साडी वापरू शकता. तसेच अजून कापड उरला असेल तर पिशवी, पाउच देखील बनवू शकता.

Cushion Cover | pinterest

NEXT : गुलाबी गाल अन् कोमल त्वचा हवीय? मग ताक वापरून वाढवा सौंदर्य

Winter Skin Care | yandex
येथे क्लिक करा...