Shreya Maskar
ताकामध्ये एक्सफोलिएशन गुणधर्म असतात. जे तुमच्या त्वचेवर ब्लीचचे काम करतात. ज्यामुळे काळवंडलेली त्वचा चमकू लागते. त्यामुळे हिवाळ्यात चेहऱ्याला ताक लावा.
ताकाचा फेस मास्क बनवण्यासाठी घट्ट ताक आणि ताज्या लिंबाचा रस इत्यादी साहित्य लागते. यांचे योग्य प्रमाण घ्या.
ताकाचा फेस मास्क बनवण्यासाठी सर्व प्रथम एका बाऊलमध्ये लिंबाच्या रस आणि दोन चमचे दही घालून चांगले फेटून घ्या.
त्यानंतर चेहरा स्वच्छ फेसवॉशने धुवा आणि कोरडा करा. त्यावर बनवलेला ताकाचा फेस मास्क लावा आणि निवांत काही वेळ छोटी झोप घ्या.
फेस मास्क १५-२० मिनिटे चेहऱ्याला लावून ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा आणि चेहऱ्याला मॉइश्चराइजर लावा.
ताकाचा फेस मास्कमुळे चेहर्यावरील काळे डाग कमी होतात. तसेच पिंपल्स देखील कमी होतात. यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो. गाल गुलाबी होतात.
महिन्यातून ४-५ वेळा हा फेस पॅक चेहऱ्याला लावा. ज्यामुळे हिवाळ्यात त्वचा कोरडी राहणार नाही. त्वचा मऊ आणि मुलायम होईल.
घरगुती कोणतेही प्रोडक्ट चेहऱ्यावर लावताना सर्वात आधी त्याची पॅच टेस्ट करा. कारण आपली त्वचा खूप संवेदनशील असते.