Winter Care : सफरचंदाचे साल फेकून देताय? थांबा! त्वचेसाठी करा 'असा' वापर, कायम चेहरा करेल ग्लो

Shreya Maskar

सफरचंदाची साल

सफरचंदाच्या सालीमध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ए, सी आणि पॉलीफेनॉल हे पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात. हे घटक त्वचा अधिक ताजेलदार, मऊ आणि चमकदार करण्यास मदत करतात.

Apple Peel | GOOGLE

फेस पॅक

सफरचंदाच्या सालीपासून फेस पॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम सफरचंद चांगले धुवा आणि सोलून घ्या. साल चांगली उन्हात वाळवा किंवा पंख्याखाली ठेवा.

Apple | yandex

गुलाब पाणी

सुकलेली सफरचंदाच्या साली मिक्सरमध्ये बारीक करा. त्यात मध , गुलाब पाणी घालून एक पेस्ट बनवा.

Rose Water | GOOGLE

फेस पॅक लावा

तयार फेस पॅक चेहऱ्याला , मानेला आणि पायाला लावून 15-20 मिनिटे तसेच राहू द्या.

Apply On Skin | GOOGLE

मालिश करा

आता चेहऱ्याला हलक्या हाताने मालिश करा आणि नंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा. त्यानंतर चेहरा मॉइश्चराइज करा.

Malish | GOOGLE

फेस पॅक किती वेळा लावावा?

महिन्यातून दोन-तीन वेळा हा फेस पॅक चेहऱ्याला लावा. त्वचा हेल्दी आणि मुलायम होईल.

How Many Times | GOOGLE

कोणी लावावा?

तेलकट, कोरडी आणि सामान्य अशा सर्व प्रकारच्या त्वचेसाठी सफरचंदाच्या सालीचा फेस पॅक फायदेशीर आहे. हिवाळ्यात कोरडी त्वचा राहत नाही.

Winter Care | GOOGLE

फायदे

सफरचंदाच्या सालीमुळे त्वचेतील मृत पेशी काढून टाकण्यास मदत होते. टॅनिंग आणि पिग्मेंटेशन हळूहळू कमी होते. चेहऱ्याला नैसर्गिक चमक मिळते.

Winter Care | GOOGLE

टीप

कोणतेही घरगुती पदार्थ किंवा प्रोडक्ट त्वचेवर लावण्यापूर्वी आवर्जून पॅच टेस्ट करा. कारण आपली त्वचा संवेदनशील असते.

Doctor | GOOGLE

Skin Care : चेहऱ्यावरील डाग कमी करायचे आहेत? मग वापरा 'हा' मॅजिकल फेसपॅक

Skin Care | GOOGLE
येथे क्लिक करा