ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
चंदन आणि गुलाबजलापासून बनवलेला फेसपॅक त्वचेला थंडावा आणि ताजेतवाने करण्यास मदत करते.
हा फेस पॅक उन्हाळ्यात त्वचा थंड ठेवण्यासाठी खास मानला जातो.
चंदन हे त्वचेसाठी फायदेशीर मानले जाते. चंदन त्वचेच जळजळ आणि चेहऱ्यावरील डाग कमी करण्यास मदत करते.
तसेच गुलाबपाणी त्वचेला हायड्रेट करते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो आणण्यास मदत करते.
या फेसपॅकचा नियमित वापर केल्याने त्वचा स्वच्छ आणि मऊ राहते.
चंदन आणि गुलाबजल फेसपॅक हा सर्व प्रकारच्या त्वचेसाठी सुरक्षित आणि फायदेशीर मानला जातो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.