ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रोटिन केसांसाठी अत्यंत आवश्यक असते. प्रोटिन हे केसांना मजबूती आणि चमक देते.
मोड आलेल्या मूगात अमिनो एसिड्स असते जे केसांसाठी प्रोटिनचा स्रोत मानले जाते .
मेथी केसांच्या मुळांना पोषण देते आणि केस गळती थांबवते.
प्रोटिनसोबतच, दही केसांना ओलावा देखील देते, ज्यामुळे केस निरोगी राहण्यास मदत होते.
हेअर मास्क बनविण्यासाठी मोड आलेले मूग, मेथी आणि दही या घटकांना मिक्स करुन घ्या.
तयार केलेल्या मिश्रणाला केसांच्या मुळांपासून ते टोकांपर्यंत पूर्णपणे लावून घ्या. केसांवर ३० मिनिटे लावून ठेवा आणि नंतर धुवून घ्या.
नियमित वापरामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते. तसेच केस जाड आणि मजबूत होतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.