ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
चेहऱ्यावरील डाग आणि ऑईल कंट्रोलसाठी बेसन आणि लिंबाचा पॅक लाभकारी मानला जातो.
बेसन हे त्वचेची खोलवर स्वच्छता करुन पोर्स साफ करण्यास मदत करतो.
लिंबाचा रस चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी करतो.
बेसन आणि लिंबाचा फेसपॅक चेहऱ्यावरील टॅनिंग दूर करण्यास मदत करतो.
हा पॅक त्वचेला मुलायम करुन रखरखीतपणा घालवतो.
तसेच हा फेसपॅक नियमित लावल्याने चेहऱ्यावरील डाग हळू-हळू कमी होण्यास मदत होते.
हा फेसपॅक चेहऱ्यावरील ग्लो हळू हळू उजळण्यास मदत करतो.
तुम्ही हा फेसपॅक चेहऱ्यावर १० मिनिटे लावून ठेवा आणि नंतर तो नॉर्मल पाण्याने धुवून टाका. चेहरा स्वच्छ टॉवेलने हळूवार पूसा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.