Black spots on onion: कांद्यावरील काळे डाग ठरू शकतात धोक्याची घंटा; खाण्यापूर्वी या गोष्टी तपासा

Surabhi Jayashree Jagdish

कांदा

कांदा हा भारतीय स्वयंपाकघरातील अत्यावश्यक घटक आहे आणि जवळपास प्रत्येक घरात रोज वापरला जातो. मात्र अनेकदा कांद्याच्या सालीवर किंवा आतील भागावर काळे डाग दिसून येतात, ज्याकडे अनेक जण दुर्लक्ष करतात.

Black mold on onion | saam tv

बुरशी

हे काळे डाग नेहमीच साधी घाण नसून काही वेळा बुरशी किंवा अयोग्य साठवणुकीचे परिणाम देखील असू शकतात. त्यामुळे अशा कांद्याचा वापर करण्यापूर्वी त्याची योग्य तपासणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

Onion storage | saam tv

जास्त आर्द्रता

कांदा ओलसर किंवा दमट ठिकाणी साठवल्यास त्यावर बुरशी वाढण्याची शक्यता वाढते. या बुरशीमुळे कांद्याच्या सालीवर किंवा मानेजवळ काळे डाग दिसू लागतात. योग्य हवा खेळती नसलेल्या जागेत कांदे ठेवल्यास ही समस्या अधिक वेगाने वाढू शकते.

Food safety | saam tv

Aspergillus niger बुरशी

कांद्यावरील काळ्या बुरशीचे सर्वात सामान्य कारण Aspergillus niger ही बुरशी असते. ही बुरशी प्रामुख्याने बाहेरील सालीवर काळ्या पावडरसारख्या थराच्या स्वरूपात दिसते.

Onion fungus | saam tv

चुकीची साठवण

काढणी, वाहतूक किंवा हाताळणीदरम्यान कांदा खराब झाल्यास बुरशी आणि इतर सूक्ष्मजीव आत प्रवेश करू शकतात. उष्ण आणि दमट वातावरणात हे सूक्ष्मजीव वेगाने वाढतात. त्यामुळे कांदा थंड, कोरड्या आणि हवेशीर ठिकाणी साठवणं आवश्यक आहे.

Immune system | saam tv

काळे डाग असलेला कांदा

जर काळे डाग बुरशीमुळे असतील आणि ती कांद्याच्या आतील भागापर्यंत पोहोचली असेल तर तो कांदा खाणं टाळलं पाहिजे. अशा कांद्याची चव, वास बदललेला असू शकतो. खराब झालेला कांदा खाल्ल्यास काही लोकांना पोटदुखी, मळमळ किंवा जुलाब यांसारख्या तक्रारी होऊ शकतात.

Food contamination | saam tv

रोग प्रतिकारशक्ती

ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे, अशा व्यक्तींना संसर्गाचा धोका तुलनेने अधिक असू शकतो. वृद्ध, कॅन्सरवर उपचार घेणारे रुग्ण किंवा अवयव प्रत्यारोपणानंतर औषधं घेणाऱ्या व्यक्तींनी अशा कांद्याचा वापर टाळावा.

Safe food practices | saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Food safety tips | saam tv

Liver Cancer: लिव्हरमध्ये कॅन्सरची गाठ तयार होत असताना पायांमध्ये दिसतात ही 3 विचित्र लक्षणं

jaundice symptoms adults
येथे क्लिक करा