Heart attack symptoms saam tv
लाईफस्टाईल

Heart attack symptoms: छातीत होणारी सततची जळजळ अॅसिडिटी समजू नका; ही 5 लक्षणं दिसली तर समजा हार्ट अटॅक येणारे

Acidity or heart attack: जेवल्यानंतर छातीत जळजळ झाली की ती अॅसिडिटी समजू नका. छातीत वेदना, जडपणा, श्वास घेण्यास त्रास, थंड घाम, चक्कर किंवा वेदना हात-जबड्यापर्यंत जाणे ही हार्ट अटॅकची संभाव्य लक्षणे असू शकतात. जाणून घ्या कोणती लक्षणे दुर्लक्षित करू नयेत आणि कधी तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.

Surabhi Jayashree Jagdish

अनेकदा जास्त जेवण केल्यानंतर छातीत जळजळ किंवा अस्वस्थपणा जाणवतो. अशावेळी अनेकजण याकडे अॅसिडिटी किंवा गॅसची समस्या म्हणून पाहतात. काहीजण गॅस कमी करण्याची औषधं घेतात, तर काही घरगुती उपाय करतात. मात्र प्रत्येक वेळी छातीत होणारी जळजळ ही अॅसिडिटीमुळेच होते असं नाही. काही वेळा हे एखाद्या गंभीर हार्ट अटॅकचं लक्षणही असू शकतं.

हृदयरोग तज्ज्ञांच्या मते, हार्ट अटॅक आणि अॅसिडिटीची काही लक्षणं सारखीच वाटू शकतात. त्यामुळे अनेकांना नेमकं काय होत आहे हे समजत नाही. परिणामी डॉक्टरांकडे जाण्यास उशीर होतो. हार्ट अटॅकच्या वेळी उपचारांना होणारा हा उशीर धोकादायक ठरू शकतो.

प्रत्येक जळजळ अॅसिडिटी नाही

दिल्लीतील सीके बिर्ला हॉस्पिटलचे कार्डिओलॉजी डायरेक्टर डॉ. अंशुल कुमार जैन यांच्या मते, छातीत जळजळ झाली की लगेच ती अॅसिडिटी आहे, असं मानणं मोठी चूक ठरू शकते. काही ठराविक लक्षणं वेळीच ओळखली तर गंभीर हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी वेळेत उपचार मिळू शकतात.

हार्ट अटॅकची लक्षणं अॅसिडिटीसारखी का वाटतात?

छातीच्या भागात हार्टसोबत अन्ननलिका आणि पोटाशी संबंधित अवयवही असतात. या अवयवांकडून मेंदूपर्यंत जाणारे नसांचे संकेत अनेकदा एकसारखे वाटू शकतात. त्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिनीत अडथळा निर्माण झाल्याने होणारी वेदनाही काही वेळा अॅसिडिटीमुळे होणाऱ्या जळजळीसारखी जाणवते.

यामुळे अनेक रुग्ण छातीत होणारा त्रास तासन्‌तास किंवा काही दिवस गॅस, अॅसिडिटी किंवा अपचन समजून घरच्या घरी उपचार करत राहतात. मात्र हार्ट अटॅकच्या वेळी हृदयाच्या स्नायूंना सतत नुकसान होत असतं. अशा परिस्थितीत प्रत्येक मिनिट महत्त्वाचं असतं. वेळेत उपचार न मिळाल्यास गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.

ही 5 लक्षणं दिसली तर लगेच डॉक्टरांकडे जा

डॉ. जैन यांच्या मते, खालीलपैकी कोणतीही लक्षणं जाणवत असतील तर त्याकडे फक्त अॅसिडिटी म्हणून पाहू नये.

छातीतील वेदना इतर भागात पसरणं

छातीत सुरू झालेला त्रास जबडा, मान, पाठ किंवा हातापर्यंत पसरत असेल, तर हे हृदयाशी संबंधित समस्येचं लक्षण असू शकतं.

श्वास घेण्यास त्रास होणं

छातीत जळजळ होत असतानाच अचानक श्वास घेण्यास अडचण येत असेल तर ही चिंतेची बाब आहे. अशावेळी तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.

चिकट घाम येणं

कुठलाही विशेष शारीरिक त्रास किंवा कारण नसताना अचानक थंड आणि चिकट घाम फुटत असेल, तर हे हार्ट अटॅकच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक असू शकतं.

अशक्तपणा, चक्कर किंवा बेशुद्ध पडणं

छातीत त्रास जाणवत असताना अचानक खूप अशक्तपणा येणं, चक्कर येणं किंवा बेशुद्ध पडणं याकडे दुर्लक्ष करू नका. अशा वेळी तातडीने वैद्यकीय मदत घ्या.

छातीत जडपणा किंवा दाब जाणवणं

हार्ट अटॅकच्या वेळी फक्त वेदना किंवा जळजळच होते असं नाही. छातीत जडपणा, दाब किंवा आवळल्यासारखं वाटणं हे देखील हृदयाशी संबंधित समस्येचं लक्षण असू शकतं.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : राहुल गांधी सुप्रीम कोर्टातून बाहेर पडले

Maharashtra News Live Update: सोमेश्वरच्या निकालात सुनेत्रा पवारांचे वर्चस्व; सातही निकाल त्यांच्या बाजूने

Late night sleeping: रात्री झोपण्याची योग्य वेळ कोणती? रात्री जागणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे

देशातील हा दुसरा स्वातंत्र्य लढा; महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी असं का म्हणाले?

Nagpur Fort : नागपूरजवळ लपलाय ३०० वर्षांचा ऐतिहासिक वारसा, कैद्यांसाठी तुरुंग बनलेला विदर्भातील 'हा' किल्ला पाहिलात का?

SCROLL FOR NEXT