Shruti Vilas Kadam
ग्लास स्किन मेकअप करण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुणे गरजेचे आहे. यासाठी सौम्य फेसवॉश वापरा. चेहऱ्यावरील धूळ, घाण आणि अतिरिक्त तेल स्वच्छ झाल्यामुळे मेकअप चांगला दिसतो.
चेहऱ्याला नॅचरल चमक देण्यासाठी चांगल्या मॉइश्चरायझरचा वापर करा. त्वचेच्या प्रकारानुसार मॉइश्चरायझर निवडा. यामुळे त्वचा मऊ आणि हायड्रेटेड राहते. तसेच मेकअप करताना चेहरा कोरडा दिसत नाही.
मेकअप करण्यापूर्वी SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त सनस्क्रीन लावा. यामुळे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण होण्यास मदत होते. सनस्क्रीन लावल्यानंतर ते त्वचेत व्यवस्थित शोषून घेऊ द्या.
ग्लास स्किन लूकसाठी चेहऱ्यावर जाड मेकअप करण्याऐवजी हलके फाउंडेशन किंवा स्किन टिंट वापरा. यामुळे चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक टिकून राहते.
चेहऱ्याला चमकदार लूक देण्यासाठी लिक्विड हायलायटर वापरा. गालांची हाडे, नाकाचा शेंडा आणि भुवयांच्या खाली थोडे हायलायटर लावा. यामुळे चेहऱ्यावर सुंदर चमक दिसते.
ग्लास स्किन मेकअपसोबत ओठही सुंदर दिसणे गरजेचे आहे. यासाठी न्यूड, पीच किंवा पिंक रंगाची लिपस्टिक निवडा. त्यावर थोडे लिप ग्लॉस लावल्यास ओठांना चमकदार लूक मिळतो.
शेवटी मेकअप जास्त वेळ टिकवण्यासाठी सेटिंग स्प्रे वापरा. यामुळे मेकअप चेहऱ्यावर व्यवस्थित राहण्यास मदत होते. मात्र, ग्लास स्किन लूकसाठी जास्त पावडर वापरणे टाळा.