त्र्यंबकेश्वरमध्ये सैराटचा थरार! बहिणीचं प्रेमसंबंध अन् भावाचा संताप; नेमकं काय घडलं?

Trimbakeshwar Sapgaon 18 Year Old Aryan Kamble Killed Case: नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सापगावमध्ये बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या रागातून १८ वर्षीय आर्यन कांबळेची हत्या करण्यात आली. या प्रकरणी संशयित आरोपी आदित्य मोंढे याला पोलिसांनी अटक केली आहे.
Trimbakeshwar police
Trimbakeshwar policesaam tv
Published On: 

नाशिक: बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या रागातून एका १८ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सापगाव येथे घडली आहे. आर्यन सोमनाथ कांबळे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसांनी संशयित आरोपी आदित्य मोंढे याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन कांबळे याचे संशयित आरोपी आदित्य मोंढे याच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा राग आदित्यच्या मनात होता. याच कारणावरून त्याने आर्यनला भेटण्यासाठी बोलावलं. सापगाव ते ब्रह्मगिरी फेरी मार्गावरील स्मशानभूमीजवळ दोघांची भेट झाली. यावेळी त्यांच्यात वाद झाला.

हा वाद विकोपाला गेल्यानंतर संशयित आरोपी आदित्यने आर्यनवर चाकूने हल्ला केला. त्याच्या पोटावर, गळ्यावर, छातीवर आणि हातावर वार करण्यात आले. या हल्ल्यात आर्यन गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. बहिणीच्या प्रेमसंबंधातून भावानेच तरुणाची हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसांनी संशयित आरोपी आदित्य मोंढे याला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

Trimbakeshwar police
तरुणाने पाणी मागितलं अन् तोंडावर लघुशंका, संतोष देशमुख प्रकरणाची पुनरावृत्ती; मराठवाडा हादरला

या खळबळजनक घटनेनंतर मृत आर्यनच्या कुटुंबीयांनी त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात धाव घेतली. मयत आर्यनचे नातेवाईक रोशन पप्पू कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्र्यंबकेश्वर पोलिसांनी आरोपी आदित्य मोंढे याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.