Heart Failure: केवळ छातीत दुखणं नाही! ही 6 लक्षणं दिसली तर समजा हार्ट फेल होणारे

Surabhi Jayashree Jagdish

हार्ट फेल्युअर

हार्ट फेल्युअरची सुरुवात अचानक पद्धतीने होते असं नाही. अनेकदा शरीरात काही छोटे बदल हळूहळू जाणवू लागतात आणि त्यांना थकवा किंवा पोटाची समस्या समजून दुर्लक्ष केलं जातं. याची लक्षणं कोणती आहेत ती पाहूयात.

early signs of heart failure | saam tv

सतत जाणवणारा तीव्र थकवा

हार्ट फेल्युअरमध्ये हृदय शरीराच्या गरजेनुसार पुरेसं रक्त पंप करू शकत नसल्यामुळे सतत थकवा जाणवू शकतो. पूर्वी सहज करता येणारी कामे करतानाही जास्त दमल्यासारखे किंवा अशक्त वाटू शकतं.

heart failure warning signs | saam tv

पोट सतत फुगल्यासारखं वाटणं

हार्ट फेल्युअरमध्ये शरीरात अतिरिक्त द्रव साचू शकतो आणि त्यामुळे पोटाच्या भागात फुगल्यासारखं किंवा जड वाटू शकतं. काही वेळा पोटाची सूज किंवा अस्वस्थता सतत जाणवू शकते. पोट फुगण्यासोबत पाय किंवा घोट्यांवरही सूज दिसत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य ठरतं.

heart failure early symptoms | saam tv

पोटाभोवतीचे कपडे घट्ट होणं

शरीरात अतिरिक्त द्रव साचल्यामुळे पोटाचा घेर वाढू शकतो आणि नेहमीचे कपडे अचानक घट्ट वाटू शकतात. हा बदल काही वेळा वजन वाढल्यासारखाही जाणवू शकतो. वजनात अचानक वाढ आणि शरीरावर सूज अशी दोन्ही लक्षणं दिसत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.

signs of heart failure | saam tv

पोट भरल्यासारखं होणं

हार्ट फेल्युअरमध्ये पोटाच्या भागात द्रव साचणं आणि रक्ताभिसरणातील बदल यामुळे भूक कमी होऊ शकते. त्यामुळे नेहमीपेक्षा कमी अन्न खाल्ल्यानंतरही पोट भरल्यासारखे वाटू शकतं. पोट फुगणं, भूक कमी होणं आणि थोडे खाल्ल्यावर लगेच पोट भरणं अशी लक्षणे वारंवार होत असतील, तर तपासणी करून घेणं आवश्यक आहे.

heart failure fatigue | saam tv

वारंवार झोप किंवा डुलकी लागणं

हार्ट फेल्युअरशी संबंधित थकवा आणि कमी ऊर्जा यामुळे दिवसभर सुस्ती किंवा झोप येत असल्यासारखं वाटू शकतं. त्यामुळे काम करताना किंवा बसलेलं असतानाही वारंवार डुलकी लागू शकते. मात्र सतत झोप येण्यासोबत इतर शारीरिक बदलही जाणवत असतील, तर त्याबाबत डॉक्टरांशी बोलणं महत्त्वाचं आहे.

heart failure bloating | saam tv

श्वास घेण्यास त्रास होणं

हृदयाची पंपिंग क्षमता कमी झाल्यास फुफ्फुसांमध्ये द्रव साचू शकतो आणि त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. सुरुवातीला हा त्रास चालताना, जिने चढताना किंवा नेहमीची कामं करताना जाणवू शकतो.

heart failure breathing problems | saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

heart failure fluid retention | saam tv

Cinnamon water: सकाळी सकाळी एक ग्लास प्या दालचिनीचं पाणी, मिळतील जबरदस्त फायदे

Weight loss | saam tv
येथे क्लिक करा