Early stomach cancer symptoms saam tv
लाईफस्टाईल

Cancer Symptoms: शरीरात होणाऱ्या 5 मोठ्या बदलांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; विविध कॅन्सरची असू शकतात लक्षणं

Silent signs of cancer: कॅन्सर (Cancer) हा एक असा गंभीर आजार आहे, ज्याची सुरुवातीची लक्षणे अनेकदा सामान्य आजारांसारखी वाटतात आणि लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. पण ही कॅन्सरची लक्षणे अनेकदा शरीरात शांतपणे वाढत असतात आणि जेव्हा ती गंभीर होतात, तेव्हा उपचार करणे कठीण होते.

Surabhi Jayashree Jagdish

कॅन्सर हा असा आजार आहे, जो शरीरात हळूहळू, शांतपणे विकसीत होत असतो. अनेकदा हा आजार गंभीर अवस्थेत गेल्यावरच समजतो. मात्र तुम्हाला माहितीये का, या आजाराबाबत शरीर आधीपासूनच आपल्याला काही संकेत देत असतं. पण आपण त्याकडे किरकोळ समजून दुर्लक्ष करतो. हीच चूक आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते.

तज्ज्ञांच्या मते, कॅन्सरवर मात करण्याचा पहिला टप्पा म्हणजे जागरूकता आणि वेळेत निदान. भीती बाळगण्यापेक्षा सतर्क राहणं अधिक गरजेचं आहे. कॅन्सरची लक्षणं प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळी असू शकतात, परंतु काही सामान्य लक्षणं अशी आहेत ज्याकडे दुर्लक्ष करणं खूप महागात पडू शकतं.

डॉक्टर सांगतात की, जर ही लक्षणं सातत्याने जाणवत असतील तर त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा. तुमची सावधगिरी तुमचं आयुष्य वाचवू शकते आणि उपचार सोपे करू शकते. ही लक्षणं कोणती आहेत ती जाणून घेऊया.

अचानक वजन कमी होणं

जर तुम्ही काहीही कारण नसताना वेगाने वजन कमी करत असाल तर ते चिंतेचं कारण असू शकतं. आहार किंवा व्यायाम न करता जर ४–५ किलो वजन कमी झालं असेल तर ते पोटाचा, फुफ्फुसांचा किंवा स्वादुपिंडाचा कॅन्सर असू शकतो.

सतत थकवा जाणवणं

विश्रांती घेतल्यानंतरही थकवा जात नसेल तर ते कॅन्सरचं लक्षण असू शकतं. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटनुसार, हा त्रास रक्ताचा कॅन्सर किंवा आतड्यांच्या कॅन्सरमध्ये अधिक दिसतो. थकव्याबरोबरच अशक्तपणा किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर त्वरित तपासणी करावी.

त्वचेतील बदल

त्वचेवर नवे डाग दिसणं, जखमा न भरणं किंवा त्वचेचा रंग बदलणं हे गंभीर संकेत असू शकतात. हे लक्षण त्वचेच्या कॅन्सरमध्ये किंवा यकृताच्या कॅन्सरमध्ये दिसते. कोणताही अनोखा बदल हलक्यात घेऊ नये.

दीर्घकाळ टिकणाऱ्या वेदना

डोकेदुखी, पाठीचा त्रास किंवा पोटदुखी अशी वेदना जर २–३ आठवडे सतत होत असेल, तर ती गंभीर कारणाशी संबंधित असू शकते. मेंदूतील गाठ, हाडांचा कॅन्सर किंवा अंडाशयाचा कॅन्सर यामध्ये हे लक्षण दिसून येतं.

असामान्य रक्तस्त्राव

शौचामध्ये किंवा लघवीत रक्त येणं, मासिक पाळीत अनियमित रक्तस्त्राव होणं किंवा खोकताना रक्त येणं ही लक्षणं गंभीर कॅन्सरची असू शकतात. हे फुफ्फुस, आतडे किंवा गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचं संकेत देतात.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परभणी जिल्ह्यात जोरदार पाऊस

Jio Prepaid Plans: जिओची धमाकेदार ऑफर! अतिरिक्त डेटा अन् एंटरटेनमेंटची मेजवानी

शिवेंद्रराजे यांनी सातारा गॅझेटवर केला खुलासा; म्हणाले... VIDEO

Shocking : ९ मुले, तिघे विवाहित; नातवंडांशी खेळण्याच्या वयात महिला २० वर्षे लहान बॉयफ्रेंडसोबत पळाली

Supreme court : सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका; राजकीय पक्षांच्या नोंदणीवरून घेतला महत्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT